टेंभी येथील चाैघांनी घेतले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST2021-07-07T04:42:30+5:302021-07-07T04:42:30+5:30

बुलडाणा : माेताळा तालुक्यातील टेंभी येथील चाैघांनी विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना ४ जुलै राेजी उघडकीस आली़ यामध्ये मातेसह ...

Poison taken by Chaigha at Tembhi | टेंभी येथील चाैघांनी घेतले विष

टेंभी येथील चाैघांनी घेतले विष

बुलडाणा : माेताळा तालुक्यातील टेंभी येथील चाैघांनी विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना ४ जुलै राेजी उघडकीस आली़ यामध्ये मातेसह चिमुकल्याचा मलकापुरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला़ तसेच इतर दाेघांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़

माकाेडी गावापासून जवळच असलेल्या टेंभी येथील समाधान तायडे यांच्या घरात ४ जुलै राेजी रात्री १२ वाजता गणेश गजानन निंबाेळे, वृषाली समाधान तायडे, वैभव समाधान तायडे, अनुभव समाधान तायडे यांनी विष प्राशन केल्याचे समाेर आले़ त्यांना तातडीने मलकापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले़ दरम्यान, ५ जुलै राेजी यातील वृषाली तायडे व अनुभव तायडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला़ तसेच गणेश निंबाेळे व वैभव तायडे यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे़

पाेलिसात केवळ अकस्मिक मृत्यूंची नाेद

या प्रकरणी मलकापूर पाेलिसांनी केवळ आकस्मिक मृत्यूंची नाेंद केली आहे़ धामणगाव बढे पाेलीस स्टेशनमध्येही या प्रकरणी ५ जुलैपर्यंत कुठलीही नाेंद नव्हती़ पाेलिस तपासात या प्रकरणाचा उलगडा हाेणार आहे़ दरम्यान, विष प्राशन केले की दिले यावरून गावात चर्चांना पेव फुटले आहे़ खरे कारण पाेलिसांच्या तपासातच समाेर येणार आहे़ सध्या तरी कारण गुलदस्त्यात आहे़

मायलेकांवर अंत्यसंस्कार

विष प्राशनामुळे मृत्यू झालेल्या वृषाली तायडे व अनुभव तायडे यांचे शवविच्छेदन केल्यानंतर टेंभी गावात शाेकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले़

Web Title: Poison taken by Chaigha at Tembhi