शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

पंचकोनी लढत

By admin | Updated: September 28, 2014 00:22 IST

युती व आघाडी संपुष्टात आल्यामुळे जळगाव जामोद मतदारसंघात पंचकोनी लढतीची शक्यता.

नानासाहेब कांडलकर /जळगाव जामोद युती व आघाडी संपुष्टात आल्यामुळे या मतदारसंघात पंचकोनी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे. ऐनवेळी युती व आघाडी तुटल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांना उमेदवार शोधण्यासाठी धावाधाव करावी लागल्याचे आज दिसून आले. त्यामुळे राकाँला उमेदवार आयात करावा लागला, तर शिवसेनेला एका तरुण पदाधिकार्‍याला उमेदवारी द्यावी लागली. काँग्रेसचा मात्र आज माहोल दिसून आला. या मतदार संघात एकूण २८ उमेदवारांनी ४८ अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारीचे प्रबळ दावेदार समजल्या जाणारे रमेशचंद्र घोलप यांनी आज शिवसेना व अपक्ष असे दोन अर्ज दाखल केले. त्यामुळे येत्या दोन दिवसात काही राजकीय खलबल होण्याची शक्यता आहे. माजी नगराध्यक्ष डॉ. स्वातीताई वाकेकर यांना काल राकाँचे तिकीट जाहीर झाले असताना त्यांनी अचानकपणे रिंगणात उतरण्यास असर्मथता दर्शविली. त्यामुळे राकाँची उमेदवारी कोणाला, याची उ त्सुकता ताणल्या गेली होती. जि.प.चे माजी उपाध्यक्षद्वय पांडुरंगदादा पाटील व संगीतराव भोंगळ तसेच विश्‍वनाथ झाडोकार यांच्यापैकी कोणीतरी रिंगणात उतरेल, असा निरीक्षकांचा अंदाज होता; परंतु तसे न घडता भाजपाकडे उमेदवारी मागणारे प्रकाशसेठ ढोकणे यांना पक्षप्रवेश देऊन त्यांना आज राकाँची उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे ढोकणे यांनी राकाँतर्फे अर्ज दाखल केला. अशीच काही स्थिती सेनेची झाली. सेनेकडे सक्षम उमेदवार नसल्याने सेनेचे शेगाव शहर प्रमुख संतोष घाटोळ या तरुणाला ऐनवेळी उमेदवारी जाहीर झाली. त्यांच्यासोबत सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ पाटील यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी सेना सध्या उमेदवारीबाबत संभ्रमात आहे. कारण प्रथम राकाँशी जवळीक असलेले व नंतर काँग्रेसकडून उमेदवारी मागणारे रमेशचंद्र घोलप यांनी आज अचानकपणे एक अर्ज शिवसेनेकडून, तर एक अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला. त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी बदलली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे झाल्यास या मतदारसंघात षटकोनी सामना होऊ शकतो. भाजपाचे उमेदवार आ.डॉ. संजय कुटे यांना सन २00९ च्या निवडणुकीतील आपल्या दोन प्रतिस्पध्र्यांंसोबत पुन्हा सामना करावा लागणार आहे. काँग्रेसचे रामविजय बुरुंगले व भारिप बमसंचे प्रसेनजीत पाटील यांच्याशी यावेळीही टक्कर आहे. मनसेचे उमेदवार गजानन वाघ यांचेही मोठे आव्हान डॉ. संजय कुटे यांना पेलावे लागणार आहे. सध्या चित्र अस्पष्ट असले तरी २00९ च्या निवडणुकीतील तीन प्रतिस्पध्र्यांंमध्ये राकाँ, सेना व मनसे या तीन नवीन उमेदवारांची भर पडल्याने कोण कोणाला घातक ठरणार, हे काही दिवसात स्पष्ट होईल.