शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

बोटावर मोजण्याएवढ्या शेतक-यांनी भरले पीककर्ज

By admin | Updated: April 23, 2017 01:14 IST

वसुलीअभावी बँकांची हालत खस्ता झाली असून त्यांचा श्वास कोंडला गेल्याचे चित्र दिसत आहे.

वसुलीअभावी बँकांचा श्वास कोंडलाखामगाव : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे भिजत घोंगडे शासनाने कायम ठेवल्याने द्विधा मनस्थितीत असलेल्या शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड करणे थांबवलेले आहे. त्यामुळे वसुलीअभावी बँकांची हालत खस्ता झाली असून त्यांचा श्वास कोंडला गेल्याचे चित्र दिसत आहे. मार्च-एप्रिल महिन्यात शेतकरी मागिल पीककर्जाचा भरणा करुन नवीन कर्ज काढण्याची तयारी करित असतात. याकरिता बँकांमध्ये शेतकऱ्यांची गर्दी असते. परंतु यावर्षी विरोधी पक्षांसह सत्ताधारी शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी रेटली जात आहे. शासनाने सुध्दा कर्जमाफी योग्यवेळी दिली जाईल असे म्हटलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात कर्जमाफीची आशा निर्माण झालेली असून कर्ज भरण्याकडे त्यांनी पाठ फिरवली आहे. याचा फटका बँकांना बसला असून प्रत्येक राष्ट्रीयकृत बँकेत बोटावर मोजण्याएवढ्या शेतकऱ्यांनी पीककर्जाचा भरणा केलेला आहे. दुसरीकडे बँकांना आरबीआयकडून जाब विचारला जात असल्याने त्यांची अडचण झाली असून बँकांचा श्वास कोंडल्याचे दिसत आहे.