शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

पंचरंगी लढत,राष्ट्रवादीत बंडखोरी

By admin | Updated: September 28, 2014 00:23 IST

खामगाव मतदारसंघात पंचरंगी लढत होणार.

अनिल गवई / खामगावभाजप-शिवसेना युतीत घटस्फोट आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी झाल्याने या विधानसभा निवडणुकीत खामगाव मतदारसंघात पंचरंगी लढत होणार असल्याचे जवळपास चित्र आज स्पष्ट झाले आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंंत मतदारसंघात १८ उमेदवारांनी २६ अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाजी बुढण यांनी पक्षांतर करून यूडीएफ या राजकीय पक्षाकडून अंतिमक्षणी उमेदवारी दाखल केली, तर भाजप आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय स्फोट झाल्याने गेल्या-तीन दिवसांमध्ये राज्यात कमालीची राजकीय उलथापालथ झाली. त्याचे पडसाद आज शनिवारी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या दिवशी दिसून आले. खामगाव मतदारसंघात उमेदवारी दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून आजपर्यंंत तब्बल १0४ जणांनी अर्जाची उचल केली; मात्र आज प्रत्यक्षात १८ उमेदवारांनी २६ उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, बहुजन समाज पार्टी, हिंदू महासभा, भारिप बहुजन महासंघ, स्वाभिमानी शेतकरी संघटना, युनायटेड डेमोक्रेटिक फ्रन्ट, मायनॉरिटी डमोक्रेटिक फ्रन्ट, इंडियन मुस्लीम लीग या प्रमुख राजकीय पक्षासह अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहे.सर्वच राजकीय पक्ष रिंगणात उतरल्यामुळे या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, भारिप या राजकीय पक्षाच्या प्रमुख उमेदवारांमध्ये लढत होणार असल्याचे संकेत आहेत. या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने विद्यमान आमदार दिलीपकुमार सानंदा यांना चवथ्यांदा रिंगणात उतरविले असून, भाजपकडून महाराष्ट्राचे नेते आ. भाऊसाहेब फुंडकर यांचे पुत्र अँड. आकाश फुंडकर रिंगणात आहेत. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीकडून माजी आमदार नाना कोकरे, तर भारि पकडून जिल्हाध्यक्ष अशोक सोनोने दुसर्‍यांदा नशीब आजमावत आहेत. शिवसेनेच्यावतीनेही तुल्यबळ लढत देणारा उमेदवार रिंगणात असल्याने आता या मतदारसंघातील लढत पंचरंगी होणार असल्याचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.