शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

फलक झाकण्याच्या सूचना

By admin | Updated: September 17, 2014 00:51 IST

आचसर संहिता ; खामगाव बसस्थानकावरील फलके झाकण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष.

खामगाव : विधानसभा निवडणुकीची घोषणा १२ सप्टेंबर रोजी झाल्यानंतर त्यादिवशीपासूनच आदर्श आचारसंहिता सुरु झाली आहे. मात्र तरीही अनेक एस.टी.बसेसवर तसेच बसस्थानकावर शासनाच्या जाहिरात अद्यापही ह्यजैसे-थेह्ण च आहेत. त्यामुळे हा आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप होत आहे. आचारसंहितेचे पालन करण्यासाठी दोन दिवसात विविध राजकीय पक्ष तसेच शासनाच्या योजनांबाबत जाहिरात देणारे फलक काढण्यात यावे, अशा सूचना आचारसंहिता अंमलबजावणी पथकाचे प्रमुख तथा शेगाव तहसीलदार डॉ.रामेश्‍वर पुरी यांनी दिले आहेत. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका १२ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आल्या आहेत. तर त्या दिवसापासूनच आदर्श आचारसंहिता लावण्यात आली आहे. त्यामुळे मतदार संघात गावागावात तसेच शहरात झळकणारे भूमिपूजन, लोकार्पण, शासनाच्या योजनाबाबत जाहिरात असलेले फलक तसेच विविध पक्षाचे फलक हटविण्याची कार्यवाही करणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने खामगाव विधानसभा म तदार संघात आचारसंहिता अंमलबजावणी पथकाचे प्रमुख डॉ.रामेश्‍वर पुरी यांनी आज आचारसंहि तेचा भंग होईल असे शहरातील फलक काढण्यासंदर्भात नगर पालिकेला तसेच ग्रामीण भागातील फलक काढण्यात संदर्भात किंवा झाकण्यासंदर्भात पंचायत समितीला आदेश दिले आहेत. मात्र तरीही खामगाव तसेच शेगाव बसस्थानकावर शासनाच्या योजनांबाबत जाहिरात देणारे फलक अद्या पही जैसे-थे च आहेत. तर अनेक बसवरील जाहिराती सुध्दा मिटविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे हा आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याचे मत व्यक्त होत आहे.