शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

रब्बीची केवळ तीन टक्के पेरणी

By admin | Updated: October 16, 2015 01:57 IST

अल्पपावसाचा फटका ; १ लाख ५२ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन.

बुलडाणा : यंदा पावसाच्या अवकृपेमुळे खरीप हंगाम शेतकर्‍यांच्या हातातून गेला. वेळेवर पाऊस न झाल्यामुळे बर्‍याच शेतकर्‍यांनी पिकांवर नांगर फिरविला. यामुळे आर्थिक व मानसिकदृष्ट्या खचलेल्या शेतकर्‍यांची रब्बी हंगामाकडून आशा वाढली आहे; मात्र रब्बी हंगाम सुरू होऊन एक महिना लोटला तरी जिल्ह्यात सात तालुक्यात केवळ चार हजार हेक्टरवर तीन टक्के रब्बीची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात खरीप आणि रब्बी पेरणीचे एकूण सरासरी क्षेत्र ७.४८ लाख हेक्टर आहे. यात १.५२ लाख हेक्टरवर रब्बीच्या पेरणीचे नियोजन कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने केले आहे. यंदा ९८ टक्के खरिपाची पेरणी होण्याची शक्यता आहे; मात्र यंदा जिल्ह्यात पाण्याची कमतरता लक्षात घेता, गहू आणि मका या पिकांपेक्षा कमी पाण्यात येणार्‍या हरभरा पिकाची पेरावाढ होण्याची शक्यता आहे. यंदा सुरुवातीला अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले, तर वेळेवर पाऊस न आल्यामुळे खरिपातील पिके शेतकर्‍यांच्या हातातून गेली. बर्‍याच तालुक्यात शेतकर्‍यांनी सुकलेल्या पिकांवर नांगर फिरविला, शिवाय आपले गुरे पिकांमध्ये सोडली. यामुळे खरिपाची पेरणी न झालेले आणि पीकबाधित झालेले असे एकूण ३६ हजार हेक्टर खरीप पेरणीक्षेत्र रब्बीकडे वळविण्यात आले. त्यामुळे खरिपात झालेले नुकसान रब्बीत भरुन निघेल, या आशेवर शेतकरी रब्बीची पेरणी करीत आहे.