अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 17:19 IST2021-03-31T17:18:46+5:302021-03-31T17:19:04+5:30
One killed in an accident : अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने रामभाऊ कांडेलकर यांचा जागीच मृत्यू झाला.

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
लोकमत न्यूज नेटवर्क
नरवेल : अज्ञात वाहनाची धडक बसल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना पूर्णा ब्रीजजवळ संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.
मलकापूर तालुक्यातील दुधलगाव खुर्द येथील रामभाऊ सदाशिव कांडेलकर (वय ३८) हे मंगळवारी डोलारखेडा सुकळी दुई (तालुका मुक्ताईनगर) येथे भाजीपाला विकण्याकरिता गेले होते. भाजीपाल्याची विक्री करून घरी परत येत असताना, पूर्णा ब्रीजजवळ संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहनाने त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १९ जी ४०८३)ला धडक दिल्याने रामभाऊ कांडेलकर यांचा जागीच मृत्यू झाला. ते मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. परंतु, आता घरातील कुटुंबप्रमुख व्यक्ती गेल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले असून, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे.