शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव पालिकेची जुनी इमारत भस्मसात

By admin | Updated: March 20, 2017 03:08 IST

लक्षावधी रुपयांच्या सागवानाचा झाला कोळसा

शेगाव, दि. १९- शेगाव बसस्थानकाजवळील नगरपालिकेच्या जुन्या इमारतीला रविवारी सायंकाळी आग लागली. या आगीत इमारत पूर्णपणे जळून खाक झाली असून, १00 वर्षांपूर्वीच्या इमारतीमधील लाखो रुपयांचे सागवान लाकूड जळले आहे.शेगाव बसस्थानकासमोरील नगरपालिकेची जुनी इमारत असून, सध्या ही इमारत बंद होती. काही वर्षांपर्यंत या इमारतीत सहायक निबंधक कार्यालय कार्यरत होते; मात्र या कार्यालयाचे स्थानांतरण झाल्यापासून ही इमारत बंद आहे. दरम्यान, या रविवारी सायंकाळी ६ च्या सुमारास या बंद इमारतीला अचानक आग लागली. या आगीने पाहता-पाहता संपूर्ण इमारतीला वेढा घातला. घटनेची माहिती न.प. च्या अग्निशमन दलाला मिळाल्यावरून त्यांनी घटनास्थळ गाठून आग विजवण्यासाठी पाण्याचा बंब सुरु केला; मात्र अपुरा असलेला पाइप आणि अग्निशमन वाहनात असलेले थोडेसे पाणी ५ मिनिटात संपले. यामुळे सदर वाहन पाणी भरण्यासाठी निघून गेले. त्यानंतर ४५ मिनिटे आग धगधगत राहिली. ७.३0 च्या सुमारास पुन्हा शेगाव न.प.चे अग्निशमन दल आणि खामगाव न.प.चे अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळविले. मुख्य बाजारात ही आग लागल्याने परिसरातील व्यावसायिकांनी आपल्या दुकानातील सामान खाली केले होते. दुसरीकडे विद्युत वितरण कंपनीकडून या भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.जमावावर सौम्य लाठीचार्ज लागलेली आग पाहण्यासाठी बाजार समिती परिसरात नागरिकांनी एकाच गर्दी केली होती. अश्यावेळी अग्निशमन दल येईल, यासाठी जागा खाली करून घेण्यासाठी शहर पोलीस स्टेशनमध्ये बंदोबस्ताकामी आलेल्या राखीव पोलीस दलाच्या जमावाने नागरिकांवर सौम्य लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. दरम्यान, ठाणेदार यशवंत बाविस्कर यांना ही बाब समजताच त्यांनी राखीव जवानांची कानउघडणी केली. लाठीचार्ज करण्याचे कोणतेच आदेश दिलेले नसताना जवानांनी हा प्रकार केल्याचे समजते. आग लावली असण्याची चर्चा न.प.च्या या जुन्या इमारतीला आग लागली नसून, ती लावण्यात आल्याची चर्चा घटनास्थळी सुरु होती. या भागात अवैध व्यवसाय सुरु करण्यासाठी ही इमारत जाळण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. या इमारतीत विद्युत पुरवठा नसताना आणि सर्व दरवाजे बंद असताना आग लागण्याचे कारण दुसरे असूच शकत नसल्याचा दावा नागरिक करीत आहेत.