शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र दिनाची ग्रामसभा मद्यविक्रेत्यांच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 23:48 IST

१ मे रोजीच्या ग्रामसभेला प्रत्येक नागरीकाने व महिला आणि युवतींनी कर्तव्यभावनेतून उपस्थित राहून ग्रामसभेमध्ये दारूबंदीचे ठराव घेणे आवश्यक आहे.

सुधीर चेके पाटीलचिखली(बुलडाणा): बुलडाणा जिल्हय़ात दूध संकलन व वितरण केंद्रापेक्षा जास्त देशी, विदेशी दारू विक्रीची दुकाने, बार, वाईन शॉपची दुकाने होती. या दुकानांना सुप्रिम कोर्टाच्या आदेशाने चाप बसल्याने आता केवळ बोटावर मोजण्याइतकीच दारूची दुकाने शिल्लक राहीली आहेत. सद्यस्थिती हे चित्र असले तरी महामार्गांवरून हद्दपार झालेली ही दुकाने महार्गांपासून ५00 मीटर अंतरावर पुन्हा थाटली जाणार आहेत. व पुन्हा दारूचा महापूर वाहून अनेकांच्या संसाराची राखरांगोळी होण्यास कारणीभूत ठरणार आहेत. ही वस्तुस्थिती पाहता किमान बंद झालेली ही दुकाने पुन्हा सुरू होणार नाहीत व नव्याने कोणाला परवाना मिळणार नाही यासाठी आता सुजान नागरीकांनी विशेषत: महिलांनी जागरूक राहणे गरजेचे असून येत्या १ मे रोजीच्या ग्रामसभेला प्रत्येक नागरीकाने व महिला आणि युवतींनी कर्तव्यभावनेतून उपस्थित राहून ग्रामसभेमध्ये दारूबंदीचे ठराव घेणे आवश्यक आहे.सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने सध्या विशेषत: शहरा जवळील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील ५00 मिटर अंतरातील सर्व देशी दारूची दुकाने, बार, वाईन शॉपी, बियर शॉपी बंद आहेत. त्यामुळे तळीरामांच्या संख्येत काही अंशी घट होत आहे. सध्या बुलडाणा जिल्हय़ातील घाटावरील लोणार, मेहकर, सिंदखेडराजा, चिखली, देऊळगावराजा व बुलडाणा या सहा तालुक्यात सुप्रिम कोर्टाच्या आदेशामुळे सुमारे ८0 टक्के मद्यविक्रीची दुकाने बंद झाली असून घाटावरील सहा तालुक्यात सद्यस्थितीत २0 देशी दारूची दुकाने, ९ बीयर शॉप, ८ वाईन बार आणि २ वाईन शॉप असे एकूण ३९ मद्यविक्रीची दुकाने शिल्लक राहीली आहेत. यामध्ये चिखली तालुक्यात मद्यविक्रीची एकूण ८९ परवानाधारक दुकाने होती. यात २ होलसेलर, ५७ वाईन बार, १६ देशी दारू व १४ बियर शॉपींचा समावेश होता. या एकूण ८९ पैकी तब्बल ७२ परवानाधारक दुकाने आजरोजी बंद आहेत. ग्रामपंचायतींचे ना हरकत प्रमाणपत्न असल्याशिवाय दारूचे दुकान सुरू करता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी १ मे रोजी होणार्‍या ग्रामसभांमध्ये दारूबंदीचे ठराव करणे गरजेचे आहे. त्यानुषंगाने शांतताप्रिय नागरिकांनी, महिलांनी आता सक्रीय होण्याची फारच गरज आहे, आपला दारू व अंमली पदार्थांना विरोध आहे हे स्पष्ट सांगण्याची गरज आहे. महामार्गाचे स्थानीय स्वराज्य संस्थांना होत असलेले हस्तांतरण थांबवले पाहिजे. गाव व शहरांत सध्या सुरु असलेली दारू दुकाने बंद करा किंवा शहराबाहेर त्यांना वेगळी जागा द्या ज्यायोगे कायदा व सुरक्षेचा धोका उद्भवणार नाही, यासाठी सामाजिक हीत जोपसणार्‍या पक्ष, संघटना, संस्थां, महिला मंडळे, बचत गट या सर्वांनी एकत्रीतपणे समोर येऊन प्रखर विरोध करणे गजरेचे आहे.