शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
2
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
3
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
6
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
7
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
8
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
9
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
10
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
11
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
12
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
13
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
14
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
15
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
16
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
17
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
18
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
19
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
20
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी

राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा आता १२ नोव्हेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:56 IST

बुलडाणा: इयत्ता दहावीच्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्या मार्फत घेण्यात येणारी राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ५ नोव्हेंबर रोजी होणार होती; मात्र काही तांत्रिक अडचणी व दिवाळीच्या सुटीचा कालावधी विचारात घेता सदर परीक्षा ५ नोव्हेंबरऐवजी १२ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. 

ठळक मुद्देतांत्रिक अडचणी, दिवाळी सुटीमुळे परीक्षा लांबणीवरशालेय क्षमता चाचणीवर भर!

ब्रम्हानंद जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: इयत्ता दहावीच्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी राज्य परीक्षा परिषद पुणे, यांच्या मार्फत घेण्यात येणारी राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा ५ नोव्हेंबर रोजी होणार होती; मात्र काही तांत्रिक अडचणी व दिवाळीच्या सुटीचा कालावधी विचारात घेता सदर परीक्षा ५ नोव्हेंबरऐवजी १२ नोव्हेंबरला घेण्यात येणार आहे. दहावीच्या प्रज्ञावान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेकडून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येते. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पीएच.डी.पर्यंत दर महिन्याला शिष्यवृत्ती देण्यात येते. यामध्ये अकरावी आणि बारावीसाठी १ हजार २५0 रुपये, पदवी तसेच पदव्युत्तर पदवीसाठी प्रतिमहिना २ हजार रुपये आणि पीएच.डी.च्या चार वर्षांसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. दहावीत शिकणारा किंवा सतरा नंबरचा फॉर्म भरून परीक्षा देणारा विद्यार्थी ज्याचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल, असे कोणीही ही परीक्षा देऊ शकतात. राज्यातील ३६६ विद्यार्थी राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी पात्र होतात. या परीक्षेची ऑनलाइन आवेदनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी १३ सप्टेंबर ४ ऑक्टोबर ठेवण्यात आला होता; परंतु त्यात काही तांत्रिक अडचणीमुळे बदल करून २0 सप्टेंबरपासून ७ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन नियमित आवेदनपत्रे भरण्याचा कालावधी ठेवण्यात आला. त्यामुळे ५ नोव्हेंबरला  होणारी राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) पुढे ढकलण्यात आली आहे. ऑनलाइनच्या तांत्रिक अडचणी व दीपावली सुटीचा कालावधी विचारात घेता सदर परीक्षा आता १२ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहे. 

शालेय क्षमता चाचणीवर भर!राज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा २00 गुणांची असून, त्यामध्ये बौद्धिक क्षमता चाचणी, भाषा चाचणी (मराठी किंवा इंग्रजी) व शालेय क्षमता चाचणी अशा तीन विषयांचा समावेश आहे; मात्र बौद्धिक क्षमता व भाषा चाचणीपेक्षा  शालेय क्षमता चाचणी या  विषयावर अधिक भर देण्यात आला आहे. त्यात बौद्धिक क्षमता चाचणीला ५0 गुण व ५0 प्रश्न आणि भाषा चाचणीलासुद्धा ५0 गुण व ५0 प्रश्न राहणार आहेत; मात्र या शालेय क्षमता चाचणी या विषयावर १00 गुण व १00 प्रश्न ठेवण्यात आले आहेत. 

पात्रतेसाठी ४0 टक्क्यांची आवश्यकताराज्यस्तर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेतील पात्रतेसाठी संवर्गनिहाय टक्केवारी ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये  बौद्धिक क्षमता चाचणी, भाषा चाचणी (मराठी किंवा इंग्रजी) व शालेय क्षमता चाचणी या प्रत्येक विषयांमध्ये पात्रतेसाठी जनरल संवर्गासाठी ४0 टक्के गुण व एस.सी., एस.टी आणि अपंग प्रवर्गासाठी ३२ टक्के गुण आवश्यक आहेत. यापेक्षा कमी गुण मिळविणारे विद्यार्थी अपात्र ठरविण्यात येणार आहेत. भाषा विषयाचे गुण पक्त उत्तीर्णतेसाठी विचारात घेतला जाणार आहेत. अंतिम निवड यादीमध्ये या गुणांचा विचार केला जाणार नाही. 

टॅग्स :Schoolशाळा