शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्ष रावळ यांचे जॅकवेलवर उपोषण

By admin | Updated: April 20, 2017 01:21 IST

मलकापूर : पूर्णा नदीपात्रात अवैधरीत्या बोट टाकून रेती उपसा होत असल्याने या बोटीतून निघणाऱ्या डीझेलमुळे नदीपात्रातील पाणी दूषित होत आहे.

मलकापूर : पूर्णा नदीपात्रात अवैधरीत्या बोट टाकून रेती उपसा होत असल्याने या बोटीतून निघणाऱ्या डीझेलमुळे नदीपात्रातील पाणी दूषित होत आहे. या दूषित पाण्यामुळे शहरवासीयांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याबाबत जळगाव व बुलडाणा जिल्हाधिकारी यांना निवेदने देऊनही कार्यवाही न झाल्याने नगराध्यक्ष अ‍ॅड.हरीश रावळ यांनी आज पूर्णामायीच्या नदीपात्रातील जॅकवेलवर आमरण उपोषण सुरू केले.मलकापूर शहराला श्री क्षेत्र धुपेश्वर येथून पूर्णा नदीपात्रातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो; मात्र गत महिनाभरापासून याच पूर्णा नदीपात्रात उपसा विहिरीजवळ रेती माफीयांनी नदीपात्रात मोठी बोट टाकून रेतीचा अवैधरीत्या उपसा चालविला आहे. या बोटीद्वारे विषारी धूर, द्रव्य तसेच डीझेल पाण्यात मिसळून या द्रव्याचा थर पाण्यावर तरंगताना दिसतो. हेच पाणी पाइपलाइनद्वारे शहरातील पाणी पुरवठा विभागातील जलशुद्धीकरण केंद्रावर शुद्धीकरण केले जाते; परंतु तरीही या पाण्याचे पाहिजे त्या प्रमाणात शुद्धीकरण होत नाही. त्यामुळे या पाण्याची दुर्गंधी येते व हेच दुर्गंधीयुक्त पाणी शहरवासीयांना प्यावे लागत असल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येऊन त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. आपल्या न्याय्य मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी नगराध्यक्ष रावळ यांनी जॅकवेलवर उपोषण छेडले आहे. या आंदोलनात नगराध्यक्ष अ‍ॅड हरीश रावळ, नगर परिषद उपाध्यक्ष हाजी रशिदखा जमादार, नगर परिषद भाराकाँ गटनेते राजेंद्र वाडेकर, माजी नगराध्यक्ष नारायणदास निहलानी, पाणी पुरवठा सभापती अनिल गांधी, शहराध्यक्ष तथा आरोग्य सभापती राजू पाटील, ज्येष्ठ नगरसेवक अनिल जैस्वाल, नगरसेवक जाकीर मेमन, गजानन ठोसर, अनिल बगाडे, अशोक जाजू, सुनील बगाडे यासह आदींनी भेटी देऊन त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा दर्शविला आहे.