मोटरसायकल घसरल्याने युवक जागीच ठार

By Admin | Updated: December 22, 2014 23:34 IST2014-12-22T23:34:57+5:302014-12-22T23:34:57+5:30

गतिरोधकवर संतुलन बिघडल्यामुळे अपघात.

The motorcycle collapsed, the youth killed on the spot | मोटरसायकल घसरल्याने युवक जागीच ठार

मोटरसायकल घसरल्याने युवक जागीच ठार

देऊळगावराजा (बुलडाणा): भरधाव वेगात असलेली मोटारसायकल घसरल्याने झालेल्या अपघातात एक युवक ठार झाल्याची घटना २२ डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजेदरम्यान घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दररोज इलेस्ट्रीक साहित्यांची विक्री करण्याकरिता राहुल यशपाल नायक वय २0 रा.गोरेगाव जि.गोंदिया हा देऊळगावराजा येथून बाहेरगावी जात होता. सोमवारी सकाळी दररोज प्रमाणे आपली मोटर सायकल एम एच ३५ झेड १४९0 ने जात होता. दरम्यान देऊळगावराजा हायस्कुल समोरील गतिरोधकवर संतुलन बिघडल्याने रस्त्याच्या खाली पडला. या अपघातात त्याच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

Web Title: The motorcycle collapsed, the youth killed on the spot