शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

मंगरूळ येथे दोन मुलांसह मातेची आत्महत्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 15:32 IST

वैशाली जितेंद्र बोर्डे (३१), ओंकार जितेंद्र बोर्डे (८)आणि छकुली उर्फ प्रतीभा बोर्डे (६) अशी मृतांची नावे आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कशेळगाव आटोळ/अंढेरा: येथून जवळच असलेल्या मंगरूळ (ईसरूळ) येथील एका विवाहीतेने आठ वर्षाचा मुलगा व सहा वर्षाच्या मुलीसह विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना ३१ आॅक्टोबर रोजी उघडकीस आली आहे. दरम्यान, या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.वैशाली जितेंद्र बोर्डे (३१), ओंकार जितेंद्र बोर्डे (८)आणि छकुली उर्फ प्रतीभा बोर्डे (६) अशी मृतांची नावे आहेत. मंगरूळ येथील वैशाली जितेंद्र बोर्डे या ३० आॅक्टोबर रोजी आपल्या दोन्ही अपत्यांसह घरातून निघून गेल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत त्या घरी न आल्याने त्यांचे पती जितेंद्र बोर्डे यांनी नातेवाईकांकडे शोधाशोध सुरू केली. सोबतच याबाबत मंगरूळ येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष आणि पोलिस पाटील यांनाही याबाबत माहिती दिली होती. नातेवाईकांकडे संपर्क करूनही त्यांचा शोध लागला नाही. दरम्यान, ३१ आॅक्टोबर रोजी बोर्डे यांच्याच शेतातील विहीरीजवळ सकाळी चपला आढळून आल्याने वैशाली बोर्डे यांनी आत्महत्यातर केली नसावी ना, असा ग्रामस्थांचा संशय बळावला. ग्रामस्थांनी विहीरीत शोध घेतला असता वैशाली, ओंकार आणि छकुलीचे मृतदेह विहीरीत आढळून आले. या प्रकरणी पोलिस पाटील ज्योती गवते यांनी अंढेरा पोलिस ठाण्यास माहिती दिली. पोलिसांनीही घटनास्थळ गाठून मतदकार्य करत तिघांचेही मृतदेह बाहेर काढले. चिखली ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करण्यात आले. आपल्या चिमुकल्या दोन अपत्यांसह विवाहीतेने आत्महत्या केल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSuicideआत्महत्या