Molestation of female police officers; Crime against the police | महिला पोलिस कर्मचाऱ्याची छेड; पोलिसाविरोधात विनयभंगाचा गुन्हा

महिला पोलिस कर्मचाऱ्याची छेड; पोलिसाविरोधात विनयभंगाचा गुन्हा

खामगाव : मलकापूर येथील पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस कर्मचाऱ्याची छेड काढल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाºयाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलकापूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत एका ३२ वर्षीय महिला पोलिस कर्मचाऱ्यांने ४ जून रोजी प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यात नमूद केले आहे की, श्याम किसन कपले नामक पोलीस कर्मचारी मलकापूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असून त्याने संबंंधीत महिला कर्मचाºयाशी जवळीक साधून एकतर्फी प्रेमातून तिचा पाठलाग करीत तिला लज्जास्पद वाटले असे शब्द प्रयोग करून तिचा विनयभंग केला. याबाबत कोठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली असल्याचे नमूद केले आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी कपले विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया ढाकणे आणि कैलास नागरे हे करीत आहेत.
 

Web Title: Molestation of female police officers; Crime against the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.