शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

शपथ घेताना आमदारांनी लक्ष वेधले

By admin | Updated: November 12, 2014 00:12 IST

बुलडाणा जिल्ह्यातील आमदारांची विधानसभेतील शपथविधी.

बुलडाणा : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन १0 नोव्हेंबरपासून सुरू झाले असून, या मध्ये आमदारांचा शपथविधी झाला. यावेळी जिल्ह्यातील आमदारांनी आपल्या निष्ठा व ङ्म्रद्धास्थाने व्यक्त करताना सभागृहाचे लक्ष वेधून घेतले. काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना स्मरून, तर भाजपाचे आमदार डॉ. संजय कुटे यांनी आई-वडिलांचा उल्लेख करून शपथ घेतली. बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी भारतीय संविधानावर हात ठेवून गांभीर्यपूर्वक शपथ घेतली.दुसर्‍यांदा सभागृहात दाखल झालेले आमदार राहुल बोंद्रे यांनी भरतीय स्वातंत्र्याचे जनक, सत्य आणि अहिंसेचा मंत्र जगाला देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना स्मरून विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. तसेच शपथेचा समारोप करताना ह्यजय जगत्, जय मानवह्ण अशा घोषणेद्वारे आपल्या शपथेचा समारोप केला.आमदार डॉ. संजय कुटे यांनी सभागृहात दुसर्‍यांदा शपथ घेताना आई-वडिलांचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. सिंदखेडराजाचे आमदार डॉ. शशीकांत खेडेकर यांनी राजमाता जिजाऊ मॉ साहेब, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व वडील स्व. नरसिंगजी देशमुख यांचे स्मरण करून शपथ घेतली. आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी ईश्‍वराला स्मरण करून शपथ घेतली. आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी सभागृहात उपलब्ध करून दिलेले विविध धर्मग्रंथ बाजूला सारत भारतीय संविधानावर हात ठेवून छत्रपती शाहू महाराज, जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सर्वसामान्य भारतीय नागरिक, कष्टकरी जनता यांचे स्मरण करून कृतज्ञता व्यक्त करीत गांभीर्यपूर्वक शपथ घेतली. अँड. आकाश फुंडकर यांनी मतदारसंघातील जनतेसोबतच आई-वडिलांचे स्मरण करून शपथ घेतली. काल सभागृहात गैरहजर असलेले आमदार चैनसुख संचेती यांनी ईश्‍वराला स्मरून शपथ घेतली.