शहरं
Join us  
Trending Stories
1
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
2
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
3
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
4
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
5
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
6
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
7
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
8
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
9
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
10
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
11
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
12
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
13
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
14
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
15
"टीम इंडियाकडून खेळायचंच नाहीये, आता तर मी..."; विराट कोहलीचा मैदानावरील Video व्हायरल
16
VIDEO : असा दबा धरून शिकार करतात सिंह, गिर नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांच्या डोळ्यांदेखत घडला अंगावर शहारा आणणारा थरार 
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
महागाईचा भडका! घाऊक महागाईचा दर ४२ महिन्यांच्या उच्चांकावर; कच्च्या तेलाच्या किमतींमुळे सर्वसामान्यांचं टेन्शन वाढलं
19
"सरकार पुढील सहा महिन्यांपर्यंत राज्यात...!"; PM नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
20
समुद्राच्या लाटा रक्ताळल्या! ओमानच्या तटावर भारतीय जहाजावर हल्ला; भारताने इराणला ठणकावून सांगितलं...
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात गैरव्यवहार

By admin | Updated: May 30, 2014 23:44 IST

मोताळा तालुक्यातील खरबडी येथील बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात हजारो रूपयांची अफरातफर!

मोताळा: तालुक्यातील खरबडी येथील भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रात हजारो रूपयांची अफरातफर करून गैरव्यवहार केल्याची गंभीर बाब समोर आली असून, या बाबत खरबडी ग्रामपंचायतसह खातेदारांनी बुलडाणा येथील रिजनल व मोताळा येथील शाखा व्यवस्थापकाकडे तक्रार करून चौकशीची मागणी केली आहे. खरबडी येथे भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक सेवा केंद्र असून प्रशांत सोळंकी या केंद्र चालकाने खरबडी ग्रामपंचायतच्या जागेमध्ये काही महिन्यांपूर्वी हे ग्राहक सेवा केंद्र सुरू केले होते. सुरूवातीला या केंद्रामध्ये सर्व व्यवहार हे सुरळीत सुरू होते. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून प्रशांत सोळंकी यांनी खरबडी येथे येणेच बंद केल्यामुळे येथील खातेदारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. सद्या हे केंद्र बंद असल्यामुळे ग्राहकांनी स्टेट बँकेच्या मोताळा शाखेशी सपंर्क साधून या बाबत विचारणा केली असता त्यांच्याकडून हे ग्राहक सेवा केंद्राचा पदभार काढून घेण्यात आल्याचे सांगितल्या गेले. या केंद्रामार्फत जी खाती काढलेली आहेत, त्याच खाते क्रमांकावर मोताळा शाखेमधून व्यवहार सुरू केला. मात्र खातेदारांना खरबडी येथील केंद्रात जेवढी रक्कम त्यावेळी खात्यात जमा केलेली होती, त्या रकमेत व मोताळा शाखेत व्यवहार करतेवेळीच्या रकमेत तफावत दिसून आली. पासबुकमध्येसुद्धा प्रत्यक्ष भरलेली रक्कम व मोताळा शाखेत व्यवहार करतांनाची रक्कम जुळत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर खातेदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गैरप्रकाराबाबत बर्‍याच खातेदारांनी भारतीय स्टेट बँकेच्या मोताळा शाखेशी सपंर्क साधून लेखी तक्रारीसुद्धा केल्या आहेत, मात्र आतापर्यंत कोणत्याही प्रकारची चौकशी झाली नसल्याचे खातेदारांचे म्हणने आहे. त्यामुळे स्टेट बँकेचे अधिकारी हे ग्राहक सेवा केंद्रचालकाला पाठिशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार खरबडी ग्रा.पं.च्या सरपंच पुष्पा गजानन सोळंके यांनी केली आहे.