लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळविले

By Admin | Updated: May 30, 2015 02:24 IST2015-05-30T02:24:14+5:302015-05-30T02:24:14+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सैलानी येथील घटना.

A minor girl escaped with a lover of marriage | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळविले

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळविले

पिंपळगाव सैलानी (जि. बुलडाणा) : लग्न करण्याचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेण्याची घटना आठ दिवसांपूर्वी रायपूर येथे घडली. याप्रकरणी मुलीच्या वडिलाने पोलीस स्टेशनला २८ मे रोजी दिलेल्या तक्रारीच्या आधारे रायपूर पोलिसांनी आज २९ मे रोजी गावातील विकास माणिकराव भोसले याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रायपूर येथील एका अल्पवयीन मुलीच्या पित्याने पोलीस तक्रार दिली की, त्यांच्या मुलीला रायपूर येथील विकास माणिकराव भोसले या युवकाने लग्न करण्याचे आमिष दाखवून पळवून नेले. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी विकास भोसले या युवकावर भादंविच्या ३६३, ३६६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. रायपूर पोलीस ठाणेदार बबन रामपुरे, सुमेरसिंह ठाकूर, उल्हास आढाव, श्रीकृष्ण चव्हाण यांनी फरार असलेल्या सदर युवकासह अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. यासंदर्भात आता दोन्हीकडील नातेवाइकांना बोलावून पोलीस पुढील निर्णय घेणार आहेत.

Web Title: A minor girl escaped with a lover of marriage