शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

हातगाड्या झाल्या ‘मिनी वाईनबार’!

By admin | Updated: July 26, 2014 22:51 IST

पोलिसांचे दुर्लक्ष : रस्त्यावर दारुची खुलेआम विक्री

खामगाव: शहरातील आमलेट पावच्या गाड्यावर काही मद्यप्रेमी सर्रास दारू पित असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. या गाड्यांवर केवळ दारू पिल्या जात नाही तर या गाड्यांवरून दारूची मोठय़ाप्रमाणात विक्री होत असल्याचे लोकमतने केलेल्या एका पाहणीत उघडकीस आले आहे.ह्यसंडे हो या मंडे, रोज खाओ अंडेह्णया प्रचलित म्हणीनुसार अंड्यापासून निर्मित विविध पदार्थांवर ताव मारणार्‍यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अंड्यापासून निर्मित पदार्थांच्या विक्रीत वाढ झाल्यामुळे गेल्या काही वर्षात शहर आणि परिसरात या पदार्थांची विक्री करणारे व्यावसायिक वाढले आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि बाजारपेठेत आमलेट पावच्या शंभराच्यावर गाड्या आहेत. या गाड्यावर आमलेट, अंडा बॉईल, बॉईल फ्राय, बॉईल भूर्जी, अंडाकरी आदी पदार्थ विकल्या जातात. अंड्याकडे स्नॅक्स म्हणूनही पाहल्या जाते. दारूडे दारू पिण्यापूर्वी ह्यस्टार्टरह्णम्हणून अंड्यापासून निर्मित मेनूलाच पसंती देतात. त्यामुळे दारू दुकानाच्या आसपास हमखास आमलेट पावच्या गाड्या दिसून येतात. या शिवाय गर्दीच्या ठिकाणीही मोठय़ाप्रमाणात आमलेट पावची विक्री होते. दरम्यान, आमलेट व्यावसायिकांवर कुणाचाही वचक नसल्यामुळे काही आमलेट विक्रेते चक्क आता या गाड्यांवरून दारूची विक्री करीत असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे काही गाड्यावर मनसोक्त दारू पिण्यास मुभा दिली जात असल्याचे चित्र आहे. बाजाराच्या दिवशी या गाड्यांवर दारू पिणार्‍यांची मोठी संख्या असते. लोकमतने केलेल्या पाहणीत दारू दुकानांच्या नजीक असलेल्या गाड्यांवर काही लोक या गाड्यावर केवळ दारू पिण्यासाठीच येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे शहरातील काही आमलेट पावच्या गाड्या मिनीवाईनबार बनल्याचे चित्र आहे.