शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विकासाबाबत नगराध्यक्षा बोंद्रे यांनी विरोधकांना चीत केले : धृपदराव सावळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST

चिखली : नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांच्या कार्यकाळात चिखलीचा विकासदेखील क्रिकेटच्या चेंडूप्रमाणे सीमापार होत असून, त्यांनी नगर परिषदेच्या पिचवर आपल्या ...

चिखली : नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांच्या कार्यकाळात चिखलीचा विकासदेखील क्रिकेटच्या चेंडूप्रमाणे सीमापार होत असून, त्यांनी नगर परिषदेच्या पिचवर आपल्या चौफेर फटकेबाजीने विरोधकांना चारीमुंड्या चीत केले. त्यांनी धावांच्या डोंगराप्रमाणे जो विकासकामांचा डोंगर उभा केला आहे, तो सर करणे विरोधकांना कदापिही शक्य नाही, असे प्रतिपादन भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांनी येथे केले.

युवा नेते कुणाल बोंद्रे यांच्या संकल्पनेतून स्थानिक तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानावर स्व. दत्ता पैठणकर स्मृतिप्रीत्यर्थ प्रथमच नगराध्यक्षा चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २७ जानेवारी रोजी या स्पर्धेचे उद्घाटन धृपतराव सावळे व माजी जि.प. उपाध्यक्ष पांडुरंग खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सुरेशआप्पा खबुतरे, शिवाजीराव बनसोडे, मंगेश व्यवहारे, संजय चेके पाटील, राजू जावळे, काशीनाथ बोंद्रे, नंदकिशोर सावडतकर, अतहर काझी, कपिल खेडेकर, शहजाद, न.प.उपाध्यक्षा वजीराबी शे.अनिस, जि.प.सदस्या डॉ.ज्योती खेडेकर, रामदास देव्हडे, सुरेंद्र पांडे, अनिल पळसकर, पंडितराव देशमुख, राजू गवई, गोपाल देव्हडे, शेखर बोंद्रे, अ‍ॅड. राजपाल बडगे, नगरसेवक प्रकाश शिंगणे, गोविंद देव्हडे, सुदर्शन खरात, विमल देव्हडे, नामू गुरुदासानी, दीपक खरात, मो.आसीफ, अ.रऊफ, अनुप महाजन, शैलेश बाहेती, पप्पू राजपूत, अमोल खेडेकर, मनोज खेडेकर, संजय गायकवाड, रहीम पठाण, सुरेंद्र ठाकूर, राजू कुलकर्णी, खालील बागवान, गोविंद कोठारी, नासीर सौदागर, यांची प्रमुख उपस्थिती होती.

दरम्यान येत्या काही महिन्यांत नगर परिषदेची निवडणूक घोषित होणार असल्याने आता हाती राहिलेल्या महिन्यांमध्ये कसोटी क्रिकेट न खेळता २०/२० सारखे खेळावे लागणार असून, या वेळात जास्तीत जास्त विकास निधी शासनाकडून खेचून आणण्याचे काम करावे लागणार असल्याचे सावळे यांनी स्पष्ट केले. सूत्रसंचालन गणेश धुंधळे यांनी केले.

शारीरिक तंदुरुस्तीसाठी मैदानी खेळ आवश्यक

: नगराध्यक्षा बोंद्रे

जीवनामध्ये खेळाचे खूप महत्त्व आहे, आजची पिढी ही मैदानी खेळ खेळण्यापेक्षा मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळण्यात जास्त व्यस्त असते. याचा विपरीत परिणाम शरीरावर होत असल्याने मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी, म्हणून या क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहेत, असे नगराध्यक्षा प्रिया बोंद्रे यांनी यावेळी स्पष्ट केले.