विवाहित महिलेची आत्महत्या, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:41 IST2021-09-24T04:41:00+5:302021-09-24T04:41:00+5:30

लव्हाळा येथील विकास साहेबराव गवई या युवकासोबत लोणार तालुक्यातील शिवणी जाट येथील नारायण श्रीराम मोरे यांच्या मुलीचा दोन वर्षांपूर्वी ...

Married woman commits suicide, charges filed against three | विवाहित महिलेची आत्महत्या, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

विवाहित महिलेची आत्महत्या, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

लव्हाळा येथील विकास साहेबराव गवई या युवकासोबत लोणार तालुक्यातील शिवणी जाट येथील नारायण श्रीराम मोरे यांच्या मुलीचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. विवाहानंतर काही दिवस संसार सुखात सुरू असताना पती विलास, सासरा साहेबराव आणि सासू भारताबाई यांच्याकडून शारीरिक व मानसिक छळ सुरू झाला. माहेरावरून पैसे घेऊन ये, अन्यथा तुला मारून टाकू, अशा धमक्या मृत मोनिका विकास गवई हिला मिळत गेल्या. उपरोक्त त्रासाची माहिती मोनिकाने वडील नारायण मोरे यांना सांगितली. नारायण मोरे यांनी लोणी लव्हाळा येथे येऊन जावई विकास यास समजावून सांगितले आणि परत घरी गेले. काही दिवस होत नाहीत तोच २१ सप्टेंबर रोजी मोनिकाने आत्महत्या केल्याची माहिती त्यांना मिळाली. साखरखेर्डा पोलिसांना माहिती कळताच ते घटनास्थळावर गेले. मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह मेहकरला पाठविला. २३ सप्टेंबर रोजी नारायण मोरे यांनी साखरखेर्डा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पाेलिसांनी सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ पुढील तपास साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार अशोक काशिकर करत आहेत.

Web Title: Married woman commits suicide, charges filed against three