शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

रमजान ईदच्या खरेदीसाठी बाजार फुलला

By admin | Updated: July 28, 2014 00:13 IST

पवित्र रमजानच्या ३0 रोजांपैकी २३ रोजे पूर्ण; शेगाव नगरीत ईदचा उत्साह.

फहीम देशमुख / शेगावमुस्लीम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याचे शेवटचे पर्व सुरू झाले असून, आगामी ईदूल फित्र अर्थात रमजान ईदसाठी खरेदीची धूमधाम सुरू आहे. या खरेदीमुळे येथील बाजार फुलला आहे.सध्या पवित्र रमजानच्या ३0 रोजांपैकी २३ रोजे पूर्ण झाले आहेत. आता वेध लागले आहेत ते ईदचे. ईदचे स्वागत करण्यासाठी लोकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतो. विशेषत: महिला, युवती व लहान मुलांची खरेदीसाठी बाजारात गर्दी वाढली आहे. यामुळे शहरातील बाजारपेठ फुलून दिसत आहे. येथील बांगड्यांच्या बाजारामध्ये पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. या बाजारात जोधपूर, कोलकाता, हैदराबाद येथील बांगड्यांची आवक अधिक असून त्यांना तुलनेने अधिक पसंती दिसते. महागाई वाढली असली तरी ईदसाठी बाजारात विक्री समाधानकारक आहे, असे व्यापार्‍यांनी सांगितले.हैदराबादच्या गोठला महिला जास्त पसंती देत आहेत. यामध्ये काचेचे सुंदर खडे सजवले असतात. ब्रासच्या बांगड्यांमध्ये फॅमिली सेट, जंबो सेटची जास्त मागणी आहे. हैदराबादी गोट २00 ते ५00 रुपयांपयर्ंत उपलब्ध आहेत. तयार कपड्यांच्या दुकानातही अशीच गर्दी असल्याचे दिसून येत आहे. युवतींमध्ये अनारकली व अंब्रेला अशा कमीजना पसंती मिळत आहे. त्याचबरोबर जयपूर, हैदराबाद व कलकत्ता येथील एंब्रॉयडरी केलेल्या सलवारची मागणी वाढली आहे.युवक-युवती महिला व थोरांच्या बरोबरच बालगोपालांसाठी विविध आकर्षक चष्मे, बेल्ट, कॅप्स, लाईट व म्युजीकचे बुट आदी मुंबई, कलकत्ता व दिल्ली येथील वस्तू व खेळण्यांमुळे बालगोपालांचाही उत्साह ईदच्या खरेदीमध्ये द्विगुणीत झाल्याचे दिसून येत आहे.