शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

व्यवसाय शिक्षणासाठी आता मराठी विषय अनिवार्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 15:49 IST

इंग्रजी व इतर माध्यमांच्या शाळांना व्यवसाय शिक्षण घ्यावयाचे असेल तरी सुद्धा मराठी हा विषय अनिवार्य ठेवण्यात आलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : समग्र शिक्षा अभियान अंतर्गत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण घेण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी दोन व्यवसाय विषयाचे ट्रेड व विद्यार्थी संख्या २५ निश्चित करण्यात आलेली आहे. परंतू यामध्ये इंग्रजी व इतर माध्यमांच्या शाळांना व्यवसाय शिक्षण घ्यावयाचे असेल तरी सुद्धा मराठी हा विषय अनिवार्य ठेवण्यात आलेला आहे.व्यवसाय शिक्षण आज काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवयासाचेही ज्ञान मिळावे, यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियांनातर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांकरिता व्यवयास शिक्षण योजना राबविण्यात येते. शाळांनी व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रम सुरू केल्यास विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय गुणरचना देण्यात आली होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांना विषय निवडीचे विकल्पही देण्यात आले होते. २०१५ मध्ये इंग्रजी व्यतिरिक्त इतर माध्यमांच्या विद्यार्थ्यांना द्वितीय भाषेऐवजी व्यवसाय विषय निवडण्याचे व इंग्रजी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना भाषा दोन किंवा भाषा तीन ऐवजी व्यवयास विषय निवडण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा २०१६-१७ पासून सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र या विषयाऐवजी व्यवसाय विषय निवडण्याची मुभा देण्यात आली. मात्र माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा २०१९ मध्ये हिंदी, उर्दू आदी माध्यमांच्या काही शाळांनी मराठी विषय वगळून व्यवसाय विषय निवडले. त्यामुळे शासनाच्या मराठी विषय अनिवार्य असल्याच्या धोरणाला बाधा येत असल्याने व्यावसाय विषय निवडण्यात काही बदल करण्यात आलेले आहेत; ज्यामध्ये मराठी विषय अनिवार्य करण्यात आला. त्यामुळे आता मराठी, इंग्रजी किंवा इतर माध्यमांच्या शाळांना व्यवसाय विषय घेण्यासाठी मराठी विषय सुद्धा अनिवार्यच राहणार आहे.द्वितीय भाषा किंवा सामाजिक शास्त्रांना पर्यायद्वितीय भाषा किंवा सामाजिक शास्त्रांना व्यवयास शिक्षणाचा पर्याय ठेवण्यात आलेला आहे. त्यानुसार मराठी माध्यमांच्या शाळांना व्दितीय भाषा किंवा सामाजिक शास्त्रे या विषयांऐवजी व्यवसाय विषय निवडता येतील. तर इंग्रजी व इतर माध्यमांच्या शाळांना मराठी विषय अनिवार्य ठेवण्यात आला आहे. मात्र सामाजिक शास्त्रे किंवा अन्य भाषा विषयांऐवजी व्यवसाय विषय निवडता येणार आहेत. एनएसक्युएफ रचनेनुसार तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सुचनेनुसार दोन व्यवसाय विषयाचे ट्रेड निश्चित करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण महत्त्वाचे आहे. माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांसाठी व्यवसाय शिक्षण योजना राबविण्याकरिता विषयांचे विकल्प देण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रथम भाषा मराठी हा विषय अनिवार्य आहे, ही बाब शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी आनंदाची आहे.- अमोल तेजनकर, जिल्हाध्यक्ष, राज्य खा. प्रा. शिक्षक संघटना बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाmarathiमराठीEducationशिक्षण