मराठी शाळा ओस!

By Admin | Updated: July 24, 2015 00:46 IST2015-07-24T00:46:11+5:302015-07-24T00:46:11+5:30

मलकापुरातील शाळांचे चित्र; पालिकेने पुढाकार घेण्याची नागरिकांची मागणी.

Marathi school dew! | मराठी शाळा ओस!

मराठी शाळा ओस!

मलकापूर (जि. बुलडाणा) : नगरपालिका शाळांची स्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढलेला कल पाहता, मराठी माध्यमाच्या शाळा ओस पडत आहे. त्यातच मराठी माध्यमाच्या शाळांना खासगी शाळांचे आव्हान उभे ठाकल्याने, या शाळांना पटसंख्या टिकवणे कठीण झाले आहे. उर्दू माध्यमासमोर असे आव्हान नसल्याने या माध्यमांच्या शाळांमध्ये मात्र विद्यार्थ्यांंची संख्या वाढल्याचे चित्र शहरात समोर आले आहे. मलकापूर येथे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची संख्या ५१ आहे. इंग्रजीच्या नादात मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे नगरपरिषद मराठी शाळा ओस पडत असून, त्यांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. या सर्व ५१ शाळांमध्ये २१ हजार ४३२ विद्यार्थ्यांंनी प्रवेश घेतलेला आहे. शहरात प्राथमिक स्तरावरच्या २२ शाळा असून, या शाळांमध्ये ४ हजार ५४0 विद्यार्थ्यांंनी प्रवेश नोंदविलेला आहे. त्यापैकी आठ शाळा उर्दू माध्यमाच्या आहेत. येथे विद्यार्थ्यांंची संख्या २0३१, तर मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये विद्यार्थी २७६३ आहेत. माध्यमिक विद्यालयांची संख्या १५ असून, त्यापैकी सहा विद्यालये उर्दू माध्यमाची आहेत. या शाळेत ४ हजार ७६३ विद्यार्थी असल्याचे दिसून येते. त्यापैकी २ हजार ४५६ मराठी, तर उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांंची संख्या २२१७ आहे. शहरात उच्च माध्यमिक शाळांची संख्या १२ असून, या शाळांमध्ये १२ हजार २१९ विद्यार्थ्यांंनी प्रवेश घेतला असल्याचे दिसते. नगरपरिषदेच्या प्राथमिक शाळांचा गोषवारा पाहिल्यास, मराठी माध्यमाच्या शाळांची संख्या सहा असून, या शाळांमध्ये फक्त १२ शिक्षक कार्यरत आहेत. प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांंची संख्या १६५ आहे; मात्र मुस्लिम समाज शिक्षणाकडे वळत असून उर्दू माध्यमाच्या पाच शाळांमध्ये १0५५ विद्यार्थ्यांंनी प्रवेश घे तल्याचे दिसते. विशेष म्हणजे, विद्यार्थी भरपूर असली तरी शिक्षकांची संख्या जेमतेम २५ आहे. नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थिसंख्या रोडावत असल्याने यापैकी काही शाळा पटसंख्येअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शिक्षकसुध्दा अतिरिक्त ठरत आहेत.

Web Title: Marathi school dew!