शालेय पोषण आहारात निघाल्या अळ्या

By Admin | Updated: October 1, 2015 00:12 IST2015-10-01T00:12:52+5:302015-10-01T00:12:52+5:30

विद्यार्थ्यांंना झाल्या उलट्या; नांदुरा तालुक्यातील सावरगाव, टाकळी वतपाळ येथील घटना.

Larders coming to school nutrition | शालेय पोषण आहारात निघाल्या अळ्या

शालेय पोषण आहारात निघाल्या अळ्या

नांदुरा (जि. बुलडाणा) : तालुक्यातील सावरगाव व टाकळी वतपाळ येथील जिल्हा परिषद शाळेच्या पोषण आहारामध्ये अळ्या निघाल्याची घटना २९ सप्टेंबरला उघडकीस आली. दरम्यान, हा आहार खाल्ल्याने सात मुलांना उलट्या झाल्यामुळे संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर पंचायत समिती सभापती अनिल इंगळे यांनी टाकळी वतपाळ व सावरगाव येथील शाळेला भेट देऊन पाहणी केली. प्रारंभी सावरगाव जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी शाळेला भेट देऊन पाहणी केली असता खिचडीत आळ्या निघाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, मुख्याध्यापक मंगेश पाऊलझगडे यांनी हा प्रकार झाल्याचे मान्य केले. सोबतच उपस्थिती भत्ता लाभार्थ्यांंंना डावलून जे लाभार्थी नाहीत, त्यांना देण्यात आल्याचेही येथे उघड झाले असून याप्रकरणात चौकशी अंती कार्यवाही केली जाईल, असे गटशिक्षणाधिकारी किशोर पडोळ यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले. दुसरीकडे शालेय पोषण आहाराच्या कामात दिरंगाई करणार्‍यांविरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दिनेश ब्राम्हणे, प्रज्ञावंत तायडे,विजयानंद तायडे, अजय तायडे, सुरेंद्र तायडे, राजेंद्र वाघोदे, प्रमोद तायडे, शेखर तायडे यांनी केली. या दोन्ही प्रकरणात सध्या चौकशी सुरू असल्याचे संवर्ग विकास अधिकारी यांनी सांगितले. या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये रोष व्यक्त होत आहे

*केंद्रप्रमुखांची भेट

केंद्र प्रमुख सुरेश डाबेराव यांनीही ३0 सप्टेंबर रोजी या शाळेला भेट देऊन पाहणी केली. सोबतच याप्रकरणात आता पंचायत समितीस्तरावरून कार्यवाहीस प्रारंभ झाला

Web Title: Larders coming to school nutrition