शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

मुकाअच्या आदेशाला केराची टोपली

By admin | Updated: July 29, 2014 23:44 IST

समायोजन झालेले मुख्याध्यापक रूजू नाही

सिंदखेडराजा : बुलडाणा जिल्हा परिषद अंतर्गत अतिरिक्त ठरलेल्या मुख्याध्यापकांचे समायोजन १५ जुलै रोजी करण्यात आले होते. परंतू, मोहाडी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेवर वरोडी येथील मुख्याध्यापकाचे समायोजन होवूनही ते २८ जुलै पर्यंत रुजू झाले नसल्याने मुकाअच्या या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. सप्टेंबर २0१३ च्या पटसंख्येनुसार ज्या उच्च प्राथमिक शाळा आहेत त्या शाळांची विद्यार्थी पटसंख्या २00९ च्या नियमानुसार १५१ असणे गरजेचे आहे. वरोडी सह अनेक उच्च प्राथमिक शाळेतील पटसंख्या १५१ पेक्षा कमी झाल्याने सिंदखेडराजा पंचायत समिती मधील १६ उच्चश्रेणी मुख्याध्यापकांचे समायोजन जिल्हा परिषदेने १५ जुलै रोजी केले. वरोडी येथील मुख्याध्यापक संतोष नामदेव सरकटे यांचेही समायोजन मोहाडी येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेवर करण्यात आले. विशेष वरोडी येथील जि.प.शाळेत १४२ विद्यार्थी संख्या असल्याने सरकटे यांची बदली मोहाडी येथे झाली. १५ जुलैलाच उपरोक्त बदलीच्या ठिकाणी जावून आठ दिवसात अहवाल पंचायत समितीला सादर करावा, असा आदेश मुकाअ यांचा असतांना २८ जुलै पर्यंत सरकटे रुजू झाले नाही. अगोदरच मोहाडी येथील मुख्याध्यापकाचे पद दिड वर्षापासून रिक्त आहे. त्याचा कारभार सहाय्यक शिक्षक शे.याकूब शे.गुलाब यांचेकडे अतिरिक्त कारभार आहे. एक पद रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सर्वत्र स्पर्धेचे युग असल्यामुळे वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण करणे गरजेचे असते. परंतु शिक्षकांचे पद रिक्त असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे. त्यामुळे पालकवर्गातही संताप व्यक्त होत आहे. तरी विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी संतोष सरकटे यांनी शाळेवर तात्काळ रुजू व्हावे, अशी मागणी पालकवर्गांंमधुन होत आहे.