शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
3
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
4
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
5
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
6
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
7
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
8
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
9
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
10
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
11
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
12
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
13
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
14
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
15
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
16
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
17
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
18
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
19
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
20
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

हमालांनी केली कृउबास बंद

By admin | Updated: November 19, 2014 01:18 IST

लोणार येथील प्रकार; हमालांची वरई दर वाढविण्याची मागणी.

लोणार (बुलडाणा): ट्रान्सपोर्ट कंपनीने वरई दर वाढवून देण्याच्या अवाजवी मागणीवरुन खरेदीदाराच्या हमालांनी आजपासून कृषी उत्पन्न बाजार समिती बंद पाडली आहे. वरई दरात वाढ होईपर्यंत कामाला सुरुवात न करण्याचा पवित्रा हमालांनी घेतल्याने बाजार समिती लवकर सुरु होण्याची शक्यता नसल्याने कास्तकार अडचणीत सापडला आहे.येथील बाजार समितीत शेतकर्‍यांकडून माल खरेदी केल्यानंतर खरेदी केलेला माल ट्रान्सपोर्टमार्फत कंपनीला पाठवताना ट्रकमध्ये भरण्यासाठी दिली जाणारी हमाली (वरई) खरेदीदारांच्या हमालांनी १0 रुपयाने वाढवून मागितली; मात्र ट्रान्सपोर्ट कंपनीने त्यामध्ये ५ ते ७ रुपयापर्यंंतची वाढ मान्य केली; परंतु खरेदीदारांच्या हमालांनी वरई दरात १0 रुपयाचीच वाढ पाहिजे, असे म्हणत बाजार समितीचा कारभार बंद पाडला. वरई दर वाढवून देण्याच्या मागणीवर बाजार समिती बंद पडण्याची दुसरी वेळ आहे. यासंदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक एस.एस.भोईटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी परवानाधारक खरेदीदारांच्या हमालांनी कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक बाजार समिती बंद पाडून शेतकर्‍यांना अडचणीत आणले असल्याचा आरोप केला आहे. शेतकर्‍यांची गैरसोय टाळण्यासाठी हमालांची वरई दराबाबत तडजोड होईपर्यंंत पर्यायी हमालांची व्यवस्था करुन बाजार समिती तत्काळ सुरु करावी, अन्यथा खरेदीदारांवर कार्यालयीन करवाई करण्यात येईल.