कबड्डीचे खुले सामने

By Admin | Updated: January 29, 2015 01:11 IST2015-01-29T01:11:42+5:302015-01-29T01:11:42+5:30

मातोळा येथे कबड्डीच्या सामन्यात ७0 संघ सहभागी.

Kabaddi Open Front | कबड्डीचे खुले सामने

कबड्डीचे खुले सामने

मोताळा (जि. बुलडाणा) : लालमाती फाट्यावर २४ जानेवारी रोजी दारासिंह राजपूत स्मृतीप्रीत्यर्थ एकदिवसीय खुले कबड्डी सामने क्रीडाप्रेमींच्या प्रचंड उत्साहात पार पडले. बुलडाणा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मुख्त्यारसिंह राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मान्यवरांच्या उपस्थित कबड्डी सामन्यांचे उद्घाटन आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते पार पडले. यानंतर झालेल्या पहिल्या सामन्यात डॉ. सपकाळ यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेकरिता प्रथम बक्षीस ३१00१, द्वितीय बक्षीस २१00१, तृतीय बक्षीस १५00१, चतुर्थ बक्षीस १000१ रुपये होते. सुमारे ७0 संघ सहभागी झाले होते. यावेळी परिसरातील क्रीडाप्रेमींची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.

Web Title: Kabaddi Open Front