शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन योजना घोटाळा; एकाच लाभार्थ्याला दोन वेळा लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 15:10 IST

लोकमत’ने बुलडाणा जिल्हयात राबविण्यात आलेल्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील घोटाळा उघड केल्यानंतर अनेक गावात झालेला गैरप्रकार समोर येत आहे.

- योगेश फरपट लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : शासकीय योजनेचा एकदा लाभ घेतल्यानंतर एकाच लाभार्थ्याला पहिल्यांदा ‘आॅफलाई़न’ व दुसऱ्यांदा ‘आॅ़नलाई़न’ लाभ दिला गेल्यााचा प्रकार पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत जिल्हयातील संग्रामपूर, खामगाव व नांदुरा तालुक्यात झाला आहे. लाभ दिलेल्या शेतकºयासोबत हातमिळवणी करीत कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी शासनाची दिशाभूल तर केलीच आहे. शिवाय अर्ज केलेल्या गरजू इतर शेतकºयांनाही योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आल्याचे दिसून येते. ‘लोकमत’ने बुलडाणा जिल्हयात राबविण्यात आलेल्या पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील घोटाळा उघड केल्यानंतर अनेक गावात झालेला गैरप्रकार समोर येत आहे. शेतकºयांचे आर्थीक उत्पन्न वाढावे यासाठी जास्तीत जास्त शेतकºयांना योजनेत समाविष्ट करून घेण्याच्या दृष्टीने आॅफलाईन योजना पहिल्यांदा सुरु केली. मात्र योजनेत पारदर्शकता यावी व शेतकºयांना सहज अर्ज भरता यावा यासाठी आॅनलाईन अर्ज प्रणाली अंमलात आणली. त्याचा दुरुपयोग होऊन आधी लाभ घेतलेल्यांनाही लाभ दिला गेल्याचे समोर येत आहे.याठिकाणच्या शेतकºयांनी घेतला दुसºयांदा लाभखामगाव तालुक्यातील आंबेटाकळी, अडगाव, अंबिकापूर, अंत्रज, भालेगाव, पिंपळगाव राजा, भेंडी, दिवठाणा, काळेगाव, कोंटी, कुंबेफळ, कंचनपूर, कंझारा, कुंबेफळ, रोहणा, लाखनवाडा, लांजूळ, निमकवळा, नायदेवी याठिकाणच्या काही शेतकºयांनी दुसºयांदा योजनेचा लाभ घेतला आहे. तर नांदुरा तालुक्यातील अलमपूर, आंबोडा, चांदूरबिस्वा, चिंचखेड, बेलुरा, धानोरा, दहिवडी, डिघी, डोलखेड, इसबपूर, जिगाव, महाळूंगी, वडनेर, माळेगाव, वसाडी, रसूलपूर याठिकाणी सुद्धा २०१२ ते २०१७ दरम्यान लाभ घेतलेल्या अनेक शेतकºयांनी पुन्हा योजनेचा लाभ घेतला आहे.याशिवाय संग्रामपूर तालुक्यातील अकोली बु, खुर्द, अटकळ, आलेवाडी, बानोदा, एकलारा, बिलखेड, बोडखा, भोन, चोंडी, धामणगाव, काकोडा, खिरोडा, लोहगाव, पळशी झाशी, मारोड, रिंगवाडी, रुधाणा, तामगाव, टूनकी, वरवटबकाल, वरखेड, वसाडी येथील १६० पेक्षा जास्त शेतकºयांनी दुसºयांदा ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेत शासनाची दिशाभूल केली आहे. यामध्ये प्रामुख्याने या संबधित शेतकºयांना लाभ मिळवून देण्यासाठी ज्या कृषी सहाय्यकांसह कृषी अधिकाºयांनी सहकार्य केले या सर्वांविरुद्ध कारवाईची मागणी होत आहे.

पंतप्रधान ठिबक सिंचन योजनेत जिल््हयात चांगले काम झाले आहे. क्षेत्रफळानुसार शेतकºयांना लाभ देण्यात आला आहे. योजना राबवितांना नियम व अटी शर्तींचा भंग केलेला नाही. काही ठिकाणी असा प्रकार घडला असल्यास निश्चित चौकशी करण्यात येईल.- नरेंद्र नाईक, जिल्हा अधिक्षककृषी अधिकारी, बुलडाणा.

 

टॅग्स :khamgaonखामगाव