इंटरनेट सेवा विस्कळीत

By Admin | Updated: December 22, 2014 23:33 IST2014-12-22T23:33:12+5:302014-12-22T23:33:12+5:30

बुलडाणा जिल्ह्यात बिएसएनएल सेवा विस्कळीत.

Internet service disrupted | इंटरनेट सेवा विस्कळीत

इंटरनेट सेवा विस्कळीत

बुलडाणा: जिल्ह्यात गत काही दिवसांपासून बिएसएनएल सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. २२ डिसेंबर रोजी तर सकाळपासून दुपारी ४ वाजतापर्यंंत जिल्ह्यातील इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्यामुळे बँकांचे ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले होते.
जिल्ह्यात सोमवारला इंटरनेट सेवा ठप्प झाल्याने भ्रमणध्वनी, इतर सेवाही बंद पडल्या होत्या. ऑनलाईन व्यवहारासाठी बँकांमध्ये बिएसएनएलचीच सेवा असून, बँकांचे ऑनलाईन व्यवहारही यामुळे खोळंबले होते. त्यामुळे ग्राहकांना बँकांमध्ये व्यवहारासाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागल. तर काही ग्राहकांनी कंटाळून परतीचा मार्ग धरला. सर्वच व्यवहार ऑनलाईन झाल्यामुळे व्यापार्‍यांचेही कामे खोळंबली होती. इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत असून, भ्रमणध्वनी धारकांना सेवा मिळत नसल्याने भ्रमणध्वनी ही शोभेची वस्तु ठरत आहे. बिएसएनएलची सुविधा घेणारे जिल्ह्यात लाखो ग्राहक असून, वारंवार विस्कळीत होत असलेल्या या सेवेमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. बिएसएनलची सेवा सुरळीत ठेवण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Web Title: Internet service disrupted