शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक ठरू पाहणाऱ्या माती तलावांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:34 IST

नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेंतर्गतच्या तलावांच्या देखभाल दुरुस्तीसंदर्भाने उपस्थित झालेल्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर ही माहिती समोर आली ...

नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेंतर्गतच्या तलावांच्या देखभाल दुरुस्तीसंदर्भाने उपस्थित झालेल्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर ही माहिती समोर आली आहे. धोरणात्मक निर्णयांतर्गत राज्यातील जुन्या तलवांची देखभाल दुरुस्ती करण्याच्या दृष्टीने मधल्या काळात जिल्हा परिषदेच्या मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील (ल.पा.) पाझर तलाव, कोल्हापुरी बंधारे, माती तलाव, सिंचन तलावांची सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणी करण्यात आली होती. काही तलावांवर मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढली, तर काही तलावाच्या ठिकाणी धोकादायक स्थिती निर्माण होण्याची शक्यता पाहता तेथे दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे. यासोबतच काही ठिकाणी तलावाची भिंतही दबली गेली आहे. परिणामी पावसाळ्यात प्रसंगी आपत्कालीन स्थिती निर्माण होण्याची शक्यता पाहता या तलावांची किंवा स्ट्रक्चरी दुरुस्ती करणे क्रमप्राप्त ठरत आहे. त्यासंदर्भाने शासनाच्या धोरणात्मक निर्णयानुसार गेल्या वर्षी जिल्हा परिषदेंतर्गतच्या ८५१ अशा स्ट्रक्चरची पाहणी व तपासणी करण्यात आली. त्यातील धोकादायक ठरू पाहणाऱ्या किंवा प्रसंगी धोका निर्माण होण्याची शक्यता असलेल्या १८० तलावांच्या ठिकाणी अतिआवश्यक असलेल्या व तात्पुरत्या स्वरूपाच्या दुरुस्तीच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यातील अत्यावश्यक ठिकाणी त्वरित कामेही करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. सोबतच अन्य कामेही पावसाळ्यापूर्वी मार्गी लावण्यात येणार आहेत.

तीन टप्प्यांत होणार कामे

जिल्हा परिषदेंतर्गतची ही कामे तीन टप्प्यांत करण्यात येणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यात ६२, दुसऱ्या टप्प्यात १०१ व तिसऱ्या टप्प्यात ३५ ठिकाणची कामे केली जाणार आहेत. त्यानुषंगाने पहिल्या टप्प्यातील ६२ ठिकाणची कामे करण्यास प्रशासकीय मान्यता मिळाली असून, त्यासाठी २६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे जिल्हा जलसंधारण अधिकारी पवन पाटील यांनी सांगितले.

चार उपविभागांत होतील कामे

मृद व जलसंधारण विभागाच्या बुलडाणा उपविभागात २३, देऊळगाव राजा उपविभागात १०, खामगाव उपविभागात २२ आणि मेहकर उपविभागात सात कामे प्रस्तावित आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव पाठविण्यात आले असून, त्याला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. निधी उपलब्ध होताच ही कामे प्राधान्य क्रमाने मार्गी लावण्यात येतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले.