शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांवरही घोंगावत आहे जलसंकट!

By admin | Updated: September 4, 2015 23:52 IST

खामगाव, मलकापुरात उद्योगांना हवे पाणी;खामगाव एमआयडीसीला लागते 0.४३ दलघमी पाणी.

मलकापूर (जि. बुलडाणा ) : तालुक्यातील दसरखेड परिसरातील एमआयडीसी परिक्षेत्रात २५0 हेक्टर जमिनीवर उद्योगांचा विस्तार झालेला आहे. जवळपास ४0 विविध उद्योगांची येथे उभारणी झालेली असून, यापैकी आजरोजी २५ उद्योग सुरू आहेत, तर १५ उद्योग बंद झालेले आहेत. वीज वितरण कंपनीचे वाढते दर, आर्थिक मंदी यांसह विविध कारणास्तव येथील बहुतांश उद्योग बंद पडत आहेत. उद्योगाकरिता मुबलक जागा, दळण-वळणाच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग व लोहमार्गाची सोय, पूर्णा नदीच्या बॅकवॉटरचे मुबलक पाणी अशा सुविधा या एमआयडीसीला मिळत आहेत. उद्योगांकरीता पाणी हा महत्त्वाचा घटक असून, येथे पाण्याची समस्या अद्याप नाही. हतनूर धरणाचं बॅक वॉटर वाघोळा पम्पिंग स्टेशनवरून दसरखेड एमआयडीसी कार्यालय परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्याची व्यवस्था येथे आहे. महिन्याला १५ ते २0 हजार क्यूबिक लिटर पाणी येथे लागते. त्यापैकी १५ टक्के पाणी पिण्याला, तर उर्वरीत उद्योगांकरिता वापरले जाते. पाण्याची स्वतंत्र व्यवस्था येथे असून, या पाण्यावरच येथे सर्वांत मोठा असलेला बिर्ला कॉटसीनसह चार पेपर मिल, तीन केमिकल इंडस्ट्रीज पूर्णत: अवलंबून आहेत. इतर उद्योगांपेक्षा अधिक प्रमाणात याच उद्योगांना अधिक पाणी लागते. त्यामुळे शासनाचा निर्णय या उद्योगांना मारक ठरू शकतो.१८५ भूखंडांचे वाटप झालेले असून, मोजक्याच भूखंडांवर उद्योग उभारणी झालेली आहे. यातील काही उद्योग तर बंद आहेत.

कमी पावसाचा फटका

            यावर्षी पावसाळा सरासरीपेक्षा बराच कमी झाल्याने भविष्यात पाणीटंचाईचे संकट लक्षात घेता, शासनाने उद्योगांना पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील सर्वांत मोठय़ा अशा खामगाव व मलकापूर येथील औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगांच्या पाणीपुरवठय़ाबाबत आढावा घेतला, तर या दोन्ही एमआयडीसींना सध्या मुबलक पाणी असले तरी भविष्यात पाण्याचे संकट भेडसावू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

खामगाव एमआयडीसीला लागते 0.४३ दलघमी पाणी

         खामगाव एमआयडीसीमध्ये ४७१ उद्योगांची नोंद असून, सद्यस्थितीत सुमारे २२५ उद्योग सुरू आहेत. एमआयडीसीच्या उद्योगासाठी गेरू माटरगाव येथील ज्ञानगंगा प्रकल्पातून पाणीपुरवठा करण्यात येतो. 0.४३ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा उद्योगांसाठी आरक्षित केलेला आहे.