शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
2
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
3
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
4
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
5
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
6
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
7
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
8
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
9
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
10
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
11
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
12
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
13
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
14
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
15
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
16
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
17
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
18
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
19
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
20
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या पेर्‍यात वाढ; कापूस घटणार

By admin | Updated: May 29, 2014 00:51 IST

गत वर्षाच्या तुलनेत सोयाबीनच्या पेर्‍यात वाढ झाली आहे. तर कापूस पेर्‍यात घट होण्याची शक्यता आहे.

बुलडाणा : वरूणदेवाचे आगमन लवकर होणार असल्याने जिल्ह्यातील बहुतांश शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु केली आहेत. जिल्ह्यात खरीप पेरणीचे एकूण क्षेत्र ९.६७ लक्ष हेक्टर आहे. यात ७.४९ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने केले आहे. तर सात लाख ४८ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी होण्याची शक्यता आहे. यात गत वर्षाच्या तुलनेत सोयाबीनच्या पेर्‍यात वाढ झाली आहे. तर कापूस पेर्‍यात घट होण्याची शक्यता आहे. गतवर्षी सोयाबीन आणि कापसाच्या निर्धारित केलेल्या क्षेत्रामध्ये सरासरी उत्पादकता कमी आली होती. यामुळे हे दोन्ही क्षेत्रात यंदा घट होण्याची शक्यता कृषी विभागाला होती; मात्र खरिपाच्या पेरणीसाठी यंदाही शेतकर्‍याने कापूस आणि सोयाबीनच्या पेरणीलाच जास्त पसंती दर्शविली. बुलडाणा जिल्ह्यात खरीप पेरणीसाठी प्रभावित क्षेत्र सात लाख ४९ हजार ८९३ हेक्टर एवढे आहे. यात यावर्षी ज्वार, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल, तीळ, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यात गत वर्षी सोयाबीनची पेरणी २६६९२९ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली होती. यावर्षी सोयाबीन पेरणीसाठी तीन लाख ६१ हजार ८९0 हेक्टरचे नियोजन करण्यात आले आहे. गत वर्षीच्या तुलनेत हे पेरणी क्षेत्र जास्त आहे. तर तूर, मूग, उडिद आणि इतर कडधान्यासाठी पिकासाठी एकूण १ लाख १९ हजार ५५२ हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक स्वरुपाच्या पावसाला सुरूवात झाली असून, शेतकर्‍यांची शेती मशागतीची कामे सुरू आहेत. तर काही शेतकरी बी-बियाणे घेण्यात मग्न आहेत.