वेतनापेक्षा खासदार निधी वाढवा !

By Admin | Updated: July 6, 2015 23:54 IST2015-07-06T23:54:10+5:302015-07-06T23:54:10+5:30

खामगाव शहरातील नागरिकांचा कल; अप्रत्यक्ष लाभामुळे वेतनवाढ नको असल्यांचे नागरिकांचे मत.

Increase MP fund rather than wages! | वेतनापेक्षा खासदार निधी वाढवा !

वेतनापेक्षा खासदार निधी वाढवा !

खामगाव:खासदारांना वेतनवाढ देण्याची मागणी येत्या अधिवेशनामध्ये लोकसभेत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर खामगाव शहरात ह्यलोकमतह्णने सोमवारी केलेल्या सर्वेक्षणामध्ये वेतनवाढ देण्यापेक्षा खासदार निधी वाढवा, अशी मागणी समोर आल्याचे स्पष्ट झाले आहे.
खासदारांना काय सुविधा असतात, याचे मेसेज सध्या व्हॉटसअँपवरून सर्वत्र फिरत आहे; मात्र याबाबत माहिती घेतली असता सद्यस्थितीत ५0 हजार रूपये वेतन असुन इतर भत्ते मिळून जवळपास एक ते दिड लाखापर्यंंत रक्कम मिळते. यामध्ये अप्रत्यक्ष लाभ जसे विज, प्रवास याचा समावेश नाही त्यामुळे वेतनवाढ दिल्यापेक्षा सध्याचा ५ कोटीचा विकास निधी वाढवून दिल्यास जनतेसाठी उपयुक्त ठरेल असेच मत या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

*खासदारांचे कार्यक्षेत्राची व्याप्ती पाहता त्यांना वेतनवाढ दिली पाहिजे, असे ३२ टक्के नागरिकांना वाटते; मात्र ५३ टक्के लोकांनी खासदारांना कशाला हवी पगारवाढ, असा प्रश्न उपस्थित केला आहे. १५ टक्के लोकांनी मात्र याबाबत काहीही कल्पना नसल्याचे मत नोंदविले आहे. या निष्कर्षावरून खासदारांना वेतनवाढ नको, असेच जनतेचे मत असल्याचीही बाब खामगाव शहरात केलेल्या या सर्वेक्षणातून समोर आली आहे.

Web Title: Increase MP fund rather than wages!