अवैध मांस वाहतूक; दोघांना पकडले

By Admin | Updated: July 30, 2015 23:15 IST2015-07-30T23:15:03+5:302015-07-30T23:15:03+5:30

मांसाची अवैध वाहतूक करताना दोघांना पकडून ४0 किलो मांस केले जप्त; नांदुरा पोलीसांची कारवाई.

Illegal meat transport; Caught both | अवैध मांस वाहतूक; दोघांना पकडले

अवैध मांस वाहतूक; दोघांना पकडले

नांदुरा (जि. बुलडाणा ): मांसाची अवैध वाहतूक करीत असताना दोन जणांना पकडून त्यांच्याकडून ४0 किलो मांस जप्त करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शहरानजीक गुरुवारी घडली. नांदुरा पोलिसांनी त्यांच्याकडे आलेल्या माहितीवरून गुरुवारी सकाळी गणी पंपाजवळ जळगाव ते अकोला जाणार्‍या एमएच ४0- ४५४८ या क्रमांकाच्या बसमधील प्रवाशांच्या साहित्याची तपासणी केली असता, अ. वहाब शे. सुभान (५२) व शे. तौसिन अ. मुनाफ (२२ रा. खामगाव) यांच्याकडे असलेल्या थैलीत ४0 किलो मांस मिळून आले. त्याची किंमत अंदाजे ५ हजार २00 रुपये आहे. याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी उपरोक्त दोघांविरुद्ध भादंविच्या कलम ६ (१) (२) ९, ११ महाराष्ट्र प्राणी सुरक्षा कायद्यासह २७८ नुसार कारवाई केली आहे. ठाणेदार प्रदीप साळुंके, सहायक उपनिरीक्षक उल्हास पाटीलसह सुनील राऊत, सुरेश हरणे, मुरलीधर वानखडे आदी पोलीस कर्मचार्‍यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Web Title: Illegal meat transport; Caught both