हमीदर केंद्रांवर चालणार अजूनही १५ दिवस मोजणी

By Admin | Updated: April 18, 2017 00:52 IST2017-04-18T00:52:39+5:302017-04-18T00:52:39+5:30

हजारो क्विंटल तुरीला मोजमापाची प्रतीक्षा!

Guarantee centers still run for 15 days | हमीदर केंद्रांवर चालणार अजूनही १५ दिवस मोजणी

हमीदर केंद्रांवर चालणार अजूनही १५ दिवस मोजणी

खामगाव : कधी नव्हे तेवढे तुरीचे उत्पादन यावर्षी जिल्ह्यात दिसून येत असून, हमी दर केंद्रांना तारखेचे जिल्ह्यात तालुका स्तरावर नाफेडमार्फत नाफेड, एफसीआय व व्हीसीएमएसमार्फत बोनससह ५ हजार ५० रुपये प्रतिक्ंिवटल दराने तुरीची खरेदी केल्या जात आहे; मात्र यावर्षी आयातीसोबतच उत्पादन जास्त व इतर कारणांमुळे सुरुवातीपासून तुरीचे भाव खुल्या बाजारात पडलेलेच असून, आज रोजीही खुल्या बाजारात तुरीचे कमाल दर ५ हजाराखालीच आहेत. परिणामी यावर्षी नाफेडच्या हमीदर केंद्रावर तुरीची आवक प्रचंड प्रमाणात झालेली आहे. मध्यंतरी या केंद्रावर १५ दिवस ते दीड महिना आवक स्वीकारणे बंद करून केंद्रावर तुरीचे मोजमाप सुरु आहे; मात्र अजूनही खामगाव तसेच मलकापूर व इतर केंद्रांवर हजारो क्विंटल तूर मोजमापाच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे या केंद्रावर अजूनही पुढील १५ दिवस तुरीचे मोजमाप चालणार आहे. खामगाव येथील केंद्रावर झालेल्या आवकपैकी १७ एप्रिल रोजी सुमारे ३० हजार क्ंिवटल तूर मोजमापासाठी मार्केट यार्डवर होती.
तसेच मलकापूर येथील केंद्रावरसुद्धा ३० हजार क्विंटल तूर मोजमापाच्या प्रतीक्षेत असल्याची माहिती संबंधित सूत्रांनी दिली.

Web Title: Guarantee centers still run for 15 days