शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
2
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
3
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
4
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
5
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
6
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
7
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
8
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
9
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
10
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
11
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
12
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
13
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
14
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
15
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
16
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
17
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
18
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
19
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
20
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
Daily Top 2Weekly Top 5

गटविकास अधिका:यांना घेराव

By admin | Updated: March 7, 2017 00:22 IST

कन्साई ग्रा.पं.च्या सात पाडय़ांमध्ये पाणीटंचाई : 15 दिवसात करणार उपाययोजना

शहादा : तालुक्यातील कन्साई ग्रामपंचायतअंतर्गत असलेल्या सात पाडय़ांवरील पाणीटंचाई दूर करण्यात यावी याबाबत निवेदन देऊनही पंचायत समितीमार्फत कुठलीही ठोस उपाययोजना होत नसल्याने सोमवारी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकत्र्यानी घेराव आंदोलन केले. दरम्यान, 15 दिवसात पाणीटंचाई दूर करण्यासाठी उपाययोजना करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
कन्साई, ता.शहादा ग्रामपंचायतअंतर्गत डेमच्यापाडा येथे 75 कुटुंबे वास्तव्यास असून पाण्यासाठी केवळ एक हातपंप आहे. तोही नादुरुस्त आहे. परिणामी ग्रामस्थांना एक ते दीड किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. मेंढय़ावळ येथे 25 कुटुंबे वास्तव्यास असून या पाडय़ावरील एकमेव हातपंप वनविकास महामंडळाच्या अधिका:यांनी बंद केला असल्याने ग्रामस्थांना रतनपूर येथून पाणी आणावे लागत आहे. केवडीपाणी येथे 90 कुटुंबे वास्तव्यास आहेत. पाण्याची कुठलीही सुविधा नसल्याने ग्रामस्थ नदीच्या पाण्याचा वापर करतात. या दूषित पाण्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे.
धजापाणी येथे 40 कुटुंबे असून विहिरीतील पाणी पुरेसे नाही. अंबापाणी येथे 80 कुटुंबे असून विहिरीच्या पाण्यावरच त्यांना अवलंबून रहावे लागत आहे. सातपिंप्री येथे 30, तर मिठापूर येथे 35 कुटुंबे असून दोन्ही पाडय़ांवर प्रत्येकी एक हातपंप आहे. मात्र ते नादुरुस्त असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. हे सातही पाडे 100 टक्के आदिवासीबहुल असून येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे डिसेंबर 2015 व 30 जानेवारी 2017 रोजी लेखी निवेदनाद्वारे करून पाणीटंचाई दूर झाली नाही तर शहादा तहसील कार्यालय अथवा पंचायत           समिती कार्यालय येथे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला  होता.
या निवेदनाची दखल जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेने गांभीर्याने घेतली नसल्याने मंगळवारी सकाळी मनसेचे जिल्हा सचिव मनलेश जायस्वाल यांच्यासह कार्यकत्र्यानी 11 वाजेच्या सुमारास गटविकास अधिकारी श्रीराम कागणे यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करून घेराव घातला. दिवसभर आंदोलन सुरू होते. जोर्पयत मागणी पूर्ण होत नाही तोर्पयत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार या वेळी कार्यकत्र्यानी केला.
पंचायत समितीचे सभापती दरबारसिंग पवार, गटविकास अधिकारी श्रीराम कागणे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता एल.ए. बोरदे, एम.पी. बिबळे, ओ.एच. गिरासे, प्रशासन अधिकारी पी.आर. वळवी, हरी लिमजी पाटील यांनी पदाधिका:यांशी चर्चा केली. त्यात या पाडय़ांच्या पाणीटंचाईच्या समस्येबाबत जिल्हा परिषदेच्या सव्रेक्षण विभागाकडून नवीन विंधन विहिरी घेण्याबाबत मंजूर कृती आराखडय़ात विषयाचा समावेश करण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी व तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने प्रपत्र ब भरून मंजुरीसाठी जि.प.च्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे तत्काळ मंजुरीस पाठविण्यात येऊन या पाडय़ांची पाणीटंचाई येत्या 15 दिवसात दूर केली जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन समाप्त करण्यात आले. या वेळी फत्तेसिंग भिल, ग्रा.पं. सदस्य संभीबाई भिल, ज्योतीबाई तडवी, राज्या भिल, दारासिंग भिल, दिलीप पवार, किरण खर्डे, गण्या पटले, सामसिंग पाडवी, कुवरसिंग वळवी यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
दरम्यान, गटविकास अधिकारी कागणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.