देऊळगाव राजा हायस्कूलमध्ये संत गाडगे महाराजांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:47 AM2021-02-26T04:47:45+5:302021-02-26T04:47:45+5:30

जयंतीनिमित्त सांस्कृतिक विभाग देऊळगाव राजा हायस्कूलच्या वतीने संत गाडगे बाबा यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. बी. ...

Greetings to Saint Gadge Maharaj at Deulgaon Raja High School | देऊळगाव राजा हायस्कूलमध्ये संत गाडगे महाराजांना अभिवादन

देऊळगाव राजा हायस्कूलमध्ये संत गाडगे महाराजांना अभिवादन

Next

जयंतीनिमित्त सांस्कृतिक विभाग देऊळगाव राजा हायस्कूलच्या वतीने संत गाडगे बाबा यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. बी. राजपुत हे होते. या वेळी पर्यवेक्षक डी. व्ही. जाधव, ज्येष्ठ शिक्षक डी. ए. खांडेभराड, डी. बी. घंटे, एस. यू. तिडके, प्राध्यापक डॉ. किरण जायभाये व सांस्कृतिक विभागाचे प्रमुख वनश्री. जनाबापू मेहेत्रे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी बाबूलाल शिवरकर यांनी गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. जयंतीनिमित्ताने शाळेच्या प्रांगणात फुलझाडांच्या रोपांची लागवड करण्यात आली. यापूर्वी लागवड केलेल्या छोट्या-मोठ्या वृक्षांचे संगोपन करण्याचा संकल्प या वेळी सर्वांनी केला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचा सांस्कृतिक विभाग, एस.व्ही. मुळे, रामदास गुरव, एस.एन. कासदेकर, सुरेश भारूका, नीलेश खंडारे, शाळेतील शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Greetings to Saint Gadge Maharaj at Deulgaon Raja High School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.