अभिवादन अभियानाला खो!

By Admin | Updated: July 6, 2015 01:50 IST2015-07-06T01:50:40+5:302015-07-06T01:50:40+5:30

सौहार्दपूर्णतेच्या योजनेला राज्य परिवहन महामंडळाची केराची टोपली.

Greetings campaign lost! | अभिवादन अभियानाला खो!

अभिवादन अभियानाला खो!

खामगाव : प्रवाशांच्या संख्येत वारंवार घट होत असल्यामुळे तोट्यात जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला नवसंजीवनी देण्यासाठी वर्षभरा पूर्वी प्रवासी अभिवादन अभियान सुरू करण्यात आले; मात्र नव्याची नवलाई संपल्यानंतर वाहकांकडून हा उपक्रम लगेच गुंडाळ्यात आल्याचे दिसून येते. खासगी प्रवासी वाहतुकीमुळे एसटी महामंडळाला तोट्याचे ग्रहण लागले आहे. या पार्श्‍वभूमीवर प्रवासी संख्या वाढविण्यासाठी महामंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये ह्यहात दाखवा, बस थांबवाह्ण, ह्यप्रवासी सेवा अभियानह्ण, ह्यज्येष्ठांसाठी अर्धे तिकीट योजनाह्ण आणि आता वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आलेले ह्यप्रवासी अभिवादन अभियानह्ण यांचा समावेश आहे. या उपक्रमांतर्गत बस स्थानकाहून एसटी सुटतेवेळी प्रवाशांना नमस्कार करून एसटी जात असलेल्या मार्गाची माहिती वाहकांना द्यावयाची होती. दरम्यान, या अभियानांतर्गत सुरुवातीच्या काळात प्रवाशांना चांगली सुविधा मिळाली; मात्र गेल्या सहा-आठ महिन्यांपासून या उपक्रमाला एसटी महामंडळातील वाहकांकडून खो दिला जात असल्याचे दिसून येते.

*चालकांचीही अरेरावी !

       एसटी महामंडळातील अधिकारी, वाहकांसोबतच चालकही प्रवाशांना उद्धट वागणूक देत असल्याच्या घटना राज्यात विविध ठिकाणी समोर येत आहेत. गेल्या मार्च महिन्यात खामगाव आगाराच्या एका चालकाने शेगाव बस स्थानकावर विद्यार्थ्यांच्या कानशिलात लगावल्याचा प्रसंग घडला हो ता. पुढे सामंजस्याने हे प्रकरण मिटविण्यात आले असले तरी यामधून एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाली होती.

*अधिका-यांचीही पाठ!

      महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील वाहकांसोबतच चालकांनीही या अभियान वजा उपक्रमाकडे पाठ फिरविली आहे. राज्य परिवहन महामंडळाची संकल्पना कितीही चांगली असली तरी प्रभावी अंमलबजावणीच्या अभावामुळे या योजनेचा इतर योजनांप्रमाणेच फज्जा उडाल्याचे चित्र आहे.

Web Title: Greetings campaign lost!