ग्रामपंचायत निवडणुकांच्या लढतीचे चित्र स्पष्ट

By Admin | Updated: July 24, 2015 00:55 IST2015-07-24T00:55:57+5:302015-07-24T00:55:57+5:30

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू; बुलडाणा, मोताळा, चिखली, लोणार तालुक्यात १३ ग्रामपंचायती अविरोध.

Gram panchayat election match picture clear | ग्रामपंचायत निवडणुकांच्या लढतीचे चित्र स्पष्ट

ग्रामपंचायत निवडणुकांच्या लढतीचे चित्र स्पष्ट

बुलडाणा : ग्रामपंचायतीच्या ४ ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी २३ जुलै अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्यामुळे ठिकठिकाणच्या तहसील कार्यालयांवर तोबा गर्दी झाली होती. अर्ज मागे घेतल्यानं तर आता जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. गावागावात आता कोठे तिरंगी, तर कोठे चौरंगी लढती होणार असल्याने उद्यापासून खर्‍या अर्थाने निवणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. बुलडाणा तालुक्यात ३, तर मोताळा आणि चिखली तालुक्यात प्रत्येकी ५ ग्रमापंचायती अविरोध झाल्या आहेत.

*बुलडाणा तालुक्यात ११९३ उमेदवार

         बुलडाणा तालुक्यात ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ४२७ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतल्याने आता प्रत्यक्ष रिंगणात ११९३ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. तर तालुक्यात सिंदखेड अंभोडा, खुपगाव या तीन ग्रमापंचायती अविरोध झाल्या. याशिवाय डोमरूळ, बोरखेड, साखळी, शिरपूर, तराडखेड या पाच ग्रामपंचातींचा प्रत्येकी एक वार्ड तर अजिसपूर वरूड आणि सोयगाव या तीन ग्रामपंचायतींचे प्रत्येकी दोन वार्ड असे एकूण २0 वार्ड अविरोध करण्यात आले. त्यामुळे बुलडाणा तालु क्यातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १६२0 उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले होते. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १६२0 उमेदवारांपैकी ४२७ मेदवारांनी रिंगणातून माघार घेतल्याने आता ११९३ उमेदवारांमध्ये लढती होणार आहेत.

*मोताळा तालुक्यात २८२ उमेदवारांची माघार

          मोताळा तालुक्यात ४ ऑगस्ट रोजी होऊ घातलेल्या ५१ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २८२ उमेदवारांनी निवडणुकीतून माघार घेत उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे १0६0 उमेदवार रिंगणात उतरेले असून, पाच ग्रामपंचायती अविरोध झाल्या आहेत. छाननी अंती १३६३ पैकी ४७२ जागांसाठी १३४२ उमेदवारांचे अर्ज शिल्लक होते; मात्र माघारी अंती १0६0 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले.

*लोणार तालुक्यात १३७ जणांची माघार

           लोणार तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या २१ जुलै रोजी झालेल्या अर्ज छाननीत ३७ उमेदवारांचे अर्ज अपात्र घोषित केल्यानंतर आज २३ जुलै रोजी ४ वाजतापर्यंंत १३७ उमेदवारांनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणातून आपली उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता निवडणूक रिंगणात ३२३ उमेदवार कायम असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार नितीन पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या लढतीचे चित्र स्पष्ट झाले.

Web Title: Gram panchayat election match picture clear