शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष बदलणा-यांना ‘अच्छे दिन’!

By admin | Updated: March 22, 2017 02:01 IST

भाजपाकडे ओढा वाढला; आयारामांमुळेच भाजप झाली प्रबळ.

विवेक चांदूरकर बुलडाणा, दि. २१- वर्षानुवर्षे एकाच पक्षाच्या सतरंज्या उचलण्याऐवजी संधीचा शोध घेऊन पक्ष बदलणार्‍या नेत्यांनाच अच्छे दिन आले असल्याचे चित्र बुलडाणा जिल्ह्यातील राजकीय घडामोडीतून स्पष्ट होत आहे. कधीकाळी काँग्रेसचे कट्टर असलेले शिवचंद्र तायडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून अध्यक्षपद मिळविले. भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे व भाजपच्या नवीन नगराध्यक्षांवरून पक्ष बदलणार्‍यांना ह्यअच्छे दिनह्ण आल्याचे निदर्शनास येत आहे. गत काही महिन्यांपासून जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूूर्णत: बदलली आहेत. भाजपच्या सत्तेचे वारे सर्वत्र वाहत असल्यामुळे अनेक नेते सध्या भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. त्यामुळे भाजपला भरती तर अन्य पक्षांना ओहोटी लागली आहे. नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत याचा प्रत्यय आला. नुकतेच जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळविलेले शिवचंद्र तायडे पूर्वी काँग्रेसचे नेते होते. त्यांनी केंद्रिय मंत्री मुकुल वासनिक यांच्यावर आक्षेप घेत पक्ष सोडला. काही महिन्यांपूर्वीच पत्र प्रकरण जिल्ह्यात बरेच गाजले. मुकुल वासनिक यांनी मराठा समाजाच्या नेत्यांवर अन्याय केला असल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपशी जवळीक साधली व सरळ अध्यक्षपद मिळविले. भाजपचे जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे हेही पूर्वी काँग्रेसमध्येच होते. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत व्हाया राष्ट्रवादी ते भाजपमध्ये आले व भाजपने त्यांना जिल्हाध्यक्षपद दिले. जिल्हा परिषद निवडणुकीतही देऊळगाव मही जि. प. सर्कलमध्ये संजय वडतकर शिवसेना सोडून भाजपात आले व विजयी झाले. मनसेचे विनोद वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला व जिल्हा परिषदेत विजयी झाले. मालूबाई मानकर यांनी पक्षबदल केला व जिल्हा परिषदेत विजय मिळविला. दुसर्‍या पक्षातून प्रवेश करणार्‍यांना भाजप संधी देत असल्याचा संदेश जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडीतून गेला आहे. त्यामुळे भाजपमध्ये येणार्‍यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.