शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

दोन घरांसह गोडाउनला आग

By admin | Updated: April 20, 2017 01:23 IST

संग्रामपूर : तालुक्यातील चांगेफळ बु. येथे महावितरण कंपनीच्या पोलवरील तारांमध्ये घर्षण झाल्याने दोन घरांसह एका गोडाउनला आग लागली.

संग्रामपूर : तालुक्यातील चांगेफळ बु. येथे महावितरण कंपनीच्या पोलवरील तारांमध्ये घर्षण झाल्याने दोन घरांसह एका गोडाउनला आग लागली. या आगीत घरातील जीवनोपयोगी साहित्य धान्य, रोख रक्कम १० हजार रूपये तसेच गोडाउनमधील साहित्य आगीत भस्मसात झाले. ही घटना बुधवारी दुपारी १ वाजता दरम्यान घडली.चांगेफळ बु. येथे जळगाव जामोद रस्त्यावर रतन वासुदेव खंडारे, कमला सुपडा जाधव यांची दोन घरे व श्रीकृष्ण पांडुरंग राहाटे यांचे या दोन घराजवळ गोडाऊन आहे. याच घराच्या बाजूला महावितरण कंपनीची मेन लाइन या घराजवळूनच जाते. दरम्यान, १ वाजेदरम्यान या महावितरण कंपनीच्या मेन लाइनच्या पोलजवळील तारामध्ये घर्षण झाल्यामुळे पोलच्या खाली असलेल्या गवताला आग लागली व पाहता पाहता ही आग दोन घरापर्यंत पोहोचली व या आगीने रौद्ररूप धारण करून या आगीत रतन वासुदेव भडारे, कमलाबाई सुपडा जाधव, यांची दोन घरे व श्रीकृष्ण पांडुरंग राहाटे यांचे गोडाउन या आगीत काही क्षणातच भस्मसात झाले. या आगीमध्ये रतन वासुदेव खंडारे यांचे घरातील रोख रक्कम १० हजार रुपये, घरातील सर्व कपडे, सर्व भांडे, गहू ३ पोते व इतर धान्य, २ सायकली, वीणा, टाळ, मृदंग, महत्त्वाची सर्व कागदपत्रे, पत्रे, धान्य टाकी व संपूर्ण घर या आगीत भस्मसात झाले. तर कमलाबाई सुपडा जाधव यांचे घरातील २ पोते गहू, ५ पत्रे व पोते ज्वारी, सात ग्रॅम सोन्याची पोत, १ गॅस सिलिंडर व संपूर्ण घर या आगीत भस्मसात झाले, तर श्रीकृष्ण पांडुरंग राहाटे यांचे गोडाउनमधील २० ताट्या, २० पत्रे व बैलगाडी व गोडाउन या आगीत भस्मसात झाले. या आगीमध्ये रतन वासुदेव खंडारे यांच्या घराला आग लागल्यामुळे ५० हजाराचे नुकसान झाले, तर कमलाबाई सुपडा जाधव यांच्या घराला आग लागल्यामुळे ३० हजाराचे नुकसान झाले तर श्रीकृष्ण पांडुरंग राहाटे यांच्या गोडाउनला आग लागल्यामुळे त्यांचे २० हजाराचे नुकसान झाले आहे.