जिल्ह्याला ८.५२ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

By Admin | Updated: May 3, 2017 19:46 IST2017-05-03T19:46:58+5:302017-05-03T19:46:58+5:30

बुलडाणा : राज्य शासनाने वृक्ष लागवड मोहिमच राबविली आहे. जिल्ह्याला ८.५२ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सन २०१६-१७ साठी मिळाले आहे.

The goal of sowing 8.52 lakh trees in the district | जिल्ह्याला ८.५२ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

जिल्ह्याला ८.५२ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

बुलडाणा : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड करणे अत्यावश्यक असून राज्य शासनाने त्यासाठी वृक्ष लागवड मोहिमच राबविली आहे. जिल्ह्याला ८.५२ लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट सन २०१६-१७ साठी मिळाले आहे. या उद्दिष्टपूर्तीकरीता समाविष्ट असलेल्या यंत्रणांना समन्वयाने कार्य करावयाचे आहे. वन विभाग व सामाजिक वनीकरण विभाग यांनी सर्व यंत्रणांशी समन्वय ठेवून उद्दिष्टपूतीर्साठी कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दिल्या.
वृक्ष लागवड उद्दिष्टपूर्तीकरीता आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी आढावा घेताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, उपवसंरक्षक बी.टी भगत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे आदी उपस्थित होते.

Web Title: The goal of sowing 8.52 lakh trees in the district