अतिक्रमणावर चालणार गजराज

By Admin | Updated: May 28, 2014 00:35 IST2014-05-28T00:23:42+5:302014-05-28T00:35:21+5:30

मेहकर शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणधारकांनी केलेले अतिक्रमण बुधवारला उठविण्यात येणार आहे.

Gajraj to run on encroachment | अतिक्रमणावर चालणार गजराज

अतिक्रमणावर चालणार गजराज

मेहकर : शहरातील विविध मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणधारकांनी केलेले अतिक्रमण बुधवारला सकाळी ९ वाजतापासून उठविण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर परिषद व महसुल विभागाच्या संयुक्त विद्यमाने पोलीसांच्या बंदोबस्तात अतिक्रमण धडक मोहिम राबविण्यात येणार आहे. शहरातील मेनरोड, लोणार वेस, स्व.दिलीपराव रहाटे चौक, पोष्टऑफीस समोरील दुकाने, बस स्टँड व एमईएस हायस्कूल समोरील दुकाने आदीठिकाणी मोठय़ा प्रमाणावर लहान लहान टपरी धारकांनी दुकानाच्या समोर टिनशेड लावून अतिक्रमण केले आहे. तसेच शहरातील काही अंतर्गत रस्त्यावरही मोठय़ा प्रमाणात अतिक्रमण बोकाळले आहे. त्यामुळे शहरातील अंतर्गत मोठमोठय़ा रस्त्यांच्या बोळ्या बनत चालल्या आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने अतिक्रमणधारकांना २२ मे पर्यंत अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीस सुद्धा देण्यात आल्याने काही अतिक्रमण धारकांनी स्वयंस्फुर्तीने आपआपले अतिक्रमण काढले. तर काही अतिक्रमण धारकांनी अद्यापपर्यंत अतिक्रमण काढलेले नाही. त्यामुळे बुधवारी सकाळी ९.३0 वाजतापासून उपविभागीय अधिकारी बेंडे, तहसिलदार निर्भय जैन, मुख्याधिकारी तानाजी घोलप, सार्वजनिक बांधकाम अधिकारी, ठाणेदार शिंदे यांच्या उपस्थितीत व पोलीसांच्या बंदोबस्तात जेसीबीद्वारे अतिक्रमण काढण्यात येणार आहे.

Web Title: Gajraj to run on encroachment