शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

‘श्री गजानन विजय’ ग्रंथाचे अमेरिकेत होणार पारायण!

By admin | Updated: April 9, 2017 00:09 IST

भक्त परिवारातर्फे विद्या पडवळ यांच्या मुखोद्गत पारायणाचे कार्यक्रम एप्रिल व जून महिन्यात होणार आहेत.

शेगाव: श्री गजानन विजय ग्रंथाच्या पारायणाचा कार्यक्रम अमेरिकेतील १0 शहरांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. संत श्री गजानन महाराजांचा भक्त परिवार अमेरिकेतही असून या भक्त परिवारातर्फे विद्या पडवळ यांच्या मुखोद्गत पारायणाचे कार्यक्रम एप्रिल व जून महिन्यात होणार आहेत. विद्या पडवळ यांचा संपूर्ण गजानन विजय ग्रंथ तोंडपाठ आहे. ग्रंथातील ३६६९ ओव्या त्या न पाहता म्हणतात. त्या एकाच बैठकीत म्हणजे साधारण ६-७ तासात एक पारायण पूर्ण करतात. अशाप्रकारे त्यांनी आतापर्यंत २00 हून अधिक पारायणे केलेली आहेत. त्यांची पारायण करण्याची शैली अप्रतिम व अद्वितीय आहे. त्या प्रसंगानुरूप वेगवेगळ्या प्रकारे आवाज काढून व वेगवेगळ्या भावमुद्रा करून ग्रंथातील प्रसंग सादर करतात, जे ऐकून आपल्याला प्रत्यक्ष महाराजांच्या काळात असल्याचा अनुभव येतो. त्यामुळे संत श्री गजानन महाराज भक्त परिवार अमेरिका यांच्यातर्फे पडवळ यांचा श्री गजानन विजय ग्रंथाचा मुखोद्गत पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पडवळ ह्या अमेरिकेत साधारणत: तीन महिने वेगवेगळ्या १0 ठिकाणी मुखोद्गत पारायण करणार आहेत. या ठिकाणी होणार कार्यक्रमसिअँटल (वॉशिंग्टन) येथे शनिवार, ८ एप्रिल २0१७ रोजी सकाळी ८ वाजता श्री साई मंदिरात ह्यश्रींह्णची मूर्ती स्थापना होईल व लगेच मुखोद्गत पारायणाला सुरु वात होईल. यानंतर शेनेक्टॅडी (न्यूयॉर्क) येथे शनिवार, १५ एप्रिल रोजी पारायणाचा कार्यक्रम होणार आहे. नेपरविले (शिकागो) येथे शनिवार, २२ एप्रिल रोजी, फोनिक्स (एरिझोना) येथे शनिवार, २९ एप्रिल, फिलाडेल्फिया (पेनसिल्वेन्या) येथे शनिवार, १३ मे, डेलास (टेक्सास) येथे शनिवार, २0 मे, सॅन फ्रान्सिस्को (कॅलिफोर्निया) येथे 0३ जून, ऐटलांटा (जॉर्जिया) येथे शनिवार, १0 जून, बोस्टन येथे शनिवार, १७ जून तर न्यू जर्सी येथे शनिवार, २४ जून रोजी कार्यक्रम होणार आहेत.