विहिरीच्या बांधकामात अफरातफर

By Admin | Updated: December 20, 2014 00:16 IST2014-12-20T00:16:25+5:302014-12-20T00:16:25+5:30

सिंदखेडराजा तालुक्यातील माळसावरगाव येथील प्रकार; जिल्हाधिका-यांकडून विहिरीची पाहणी.

Fraud in the construction of wells | विहिरीच्या बांधकामात अफरातफर

विहिरीच्या बांधकामात अफरातफर

सिंदखेडराजा (बुलडाणा) : तालुक्यातील माळसावरगावला तंटामुक्ती पुरस्कारातून मिळालेल्या दोन लाख रुपये बक्षिसातून सार्वजनिक विहिरीचे बांधकाम करण्याचे ठरले; परंतु ग्रामपंचायतने विहिरीचे बांधकाम न करता अफरातफर केली असल्याचा कारणावरून जिल्हाधिकारी यांनी सदर विहिरीची पाहणी केली. गेल्या तीन वर्षांपूर्वी तंटामुक्ती पुरस्काराच्या दोन लाख रुपयांमध्ये अनेक वर्षांपासून गावकर्‍यांची तहान भागविणार्‍या सार्वजनिक विहिरीचे बांधकाम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दोन लाख रुपये शासनाने ग्रामपंचायतच्या खात्यात जमा केले. सदर विहिरीचे जुने बांधकाम ग्रामपंचाय तने काढलेसुद्धा; परंतु विहिरीचे बांधकाम न करताच सर्व रक्कम हडप केल्याची तक्रार गावकर्‍यांनी अनेकवेळा संबंधित खात्याकडे केली; परंतु या संदर्भात कुठल्याच प्रकारची चौकशी झाली नाही. १५ डिसेंबर रोजी दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक माळ सावरगाव येथे येणार असल्यामुळे जिल्हाधिकारी जोशी, मुकाअ देशमुख गावात आले होते. दरम्यान, त्यांना ग्रामस्थांनी विहिरीवर नेऊन सदर प्रकार दाखविला. या संदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी सरपंच संतोष कठोर, भीमराव दाभाडे आदी ग्रामस्थांनी केली.

Web Title: Fraud in the construction of wells