चार गुटखा विक्रेत्यांना अटक

By Admin | Updated: January 17, 2015 00:12 IST2015-01-17T00:12:59+5:302015-01-17T00:12:59+5:30

लोणार येथे ८३ हजार रुपयांचा माल जप्त.

Four gutkha shoppers arrested | चार गुटखा विक्रेत्यांना अटक

चार गुटखा विक्रेत्यांना अटक

लोणार (जि. बुलडाणा) : लोणार पोलिसांनी सापळा रचून अवैध गुटखा विक्री करणार्‍यांना रंगेहाथ पकडून त्यांच्याकडून २ दुचाकीसह ८३ हजार रुपयांचा गुटखा माल जप्त केला आहे. गुटखा विक्री करणार्‍या चौघांना अटक केल्याची घटना १६ जानेवारी रोजी घडली.
शहरात अवैध गुटखा विक्री जोमात सुरु होती. गुटखा विक्रीवर बंदी असतानासुद्धा लोणी मार्गे शहरात अवैध गुटखा येत असल्याची माहिती लोणार पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक आकाश शिंदे यांना १६ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजता मिळाली. त्यावरुन त्यांनी अवैध गुटखा विक्रेत्यांवर पाळत ठेवली होती. दरम्यान, नीतेश चौधरी, अलताफ खान वलईत खान, शे.जमीर शे.कदीर हे तिघे लोणी मार्गे शहरात गुटखा आणून विक्री करीत असल्याचे समजताच सहायक पोलीस निरीक्षक आकाश शिंदे यांच्यासह पोकाँ संजय जाधव, कैलास चतरकर, शे.शोयब, रवींद्र इंगळे, अतुल पवार, गोविंद होनमने यांनी गुटखा विक्री करणार्‍या तीन जणांना स्थानिक जैन मंदिर परिसरात रंगेहाथ पकडले. त्यानंतर केलेल्या चौकशीवरून उपरोक्त तिघांनी गजानन मापारी यांच्याकडून गुटखा घेतल्याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ गजानन मापारी यासदेखील अटक केली. अवैधरीत्या गुटखा जवळ साठवून त्याची वाहतूक व विक्री केल्यावरुन लोणार पोलिसांनी नीतेश चौधरी, अलताफ खान वलईत खान, शे.जमीर शे.कदीर, गजानन मापारी या चार जणांविरुद्ध कलम ३२८ अन्न सुरक्षा आणि औषधनुसार कारवाई करुन गुन्हा दाखल केला आहे. गुटख्याची अवैध विक्री करणार्‍यांविरुद्ध कारवाई होताच शहरातील पानटपर्‍या बंद करून गुटखा विक्रेत्यांनी पळ काढला होता, तर काही ठिकाणी चोरीछुपे १0 रुपयेपेक्षा अधिक दराने गुटखा पुड्यांची विक्री केली गेली.

Web Title: Four gutkha shoppers arrested