शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

महिन्याला पाच हजार सिटी स्कॅन, शासकीय दर नावालाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:34 IST

राज्य सरकारने कोरोना रुग्णांसाठी खासगी केंद्रामध्ये सिटी स्कॅनचा दर निश्चित केला आहे. २ हजार ५०० रुपयांपेक्षा जास्त दर आकारू ...

राज्य सरकारने कोरोना रुग्णांसाठी खासगी केंद्रामध्ये सिटी स्कॅनचा दर निश्चित केला आहे. २ हजार ५०० रुपयांपेक्षा जास्त दर आकारू नये, असे निर्देशही दिले आहेत. असे असताना, काही खासगी केंद्र ३५०० ते ४५०० रुपये शुल्क वसूल करीत असल्याच्या तक्रारी आहेत. खासगी केंद्रातील कोरोना रूग्णांना सीटी स्कॅन आणि इतर तपासण्यांसाठी दामदुपटीने दर मोजावे लागत आहे. बुलडाणा शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचाही तुटवडा निर्माण झाला असून, खासगी रूग्णालयाशी संलग्न असलेले औषध दुकानदार रूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांच्या नातेवाईकांकडून अव्वाच्या सव्वा दराने पैसे उकळत आहेत. मात्र, याकडे शासकीय यंत्रणेचे अक्षरक्षा दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहेे.

दुपटीने वाढले सीटी स्कॅन एचआरसीटी

कोरोना विषाणु संसर्गाचा उद्रेक वाढत असतानाच कोरोनाबाधित रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अतिरीक्त शुल्क मोजावे लागत आहे. सीटीस्कॅन तसेच विविध तपासण्यांसाठी दूपटीने शुल्क आकारल्या जात आहे. त्यामुळे कोरोना बाधित रूग्ण आणि त्यांचे नातेवाईक गत काही दिवसांपासून मेटाकुटीस आले आहेत.

कोरोना कालावधीत सेवा देण्यासाठी शहरातील खासगी डाॅक्टर प्रयत्नरत आहेत. रूग्णांना सुविधा देण्यासाठी खासगी डाॅक्टरांची धडपड सुरू आहे. सेवेलाच खासगी डाॅक्टर आणि रक्तपेढी तसेच सीटी स्कॅनचीही सेवा दिली जात आहे. दरम्यान, शासकीय दरानुसारच सर्व शुल्क आकारले जातात. मात्र, काही रूग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडून अतिरिक्त दर आकारल्या जात असल्याचे आरोप बिनबुडाचे आहेत.

-डॉ. के.एम. टिकार,

शासनाने निश्चित केलेले दर

१६ स्लाईसखालील सिटी स्कॅन २००० रूपये

१६ ते ६४ स्लाईस सिटी स्कॅन २५०० रूपये

६४ पेक्षा अधिक स्लाईस सिटी स्कॅन ३००० रूपये

कोरोना संसर्ग काळात सरकारी रूग्णालयात जागा उपलब्ध नसल्यामुळे खासगी रूग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. खासगी रूग्णालयांकडून हव्या तशा सुविधा दिल्या जात आहेत. मात्र, सुविधांसाठी अरिरिक्त पैसे घेतल्या जात आहेत. तर सीटीस्कॅनसाठीही पैसेही घेतले जाताहेत.

- विमल खरात, नातेवाईक, मेहकर.

कोरोना संसर्गाचा दुर्दवी सामना परिवारातील दोन सदस्यांना करावा लागत आहे. गत दहा दिवसांपासून दोन्ही रूग्ण एका खासगी रूग्णालयात भरती आहे. या रूग्णालयातून उपचारासाठी लागणारे इंजेक्शन आणि इतर सुविधांसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जात आहेत. नाइलाजाने रूग्ण वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे.

- कैलास पवार, नातेवाईक, धाड.