नांदुरा (जि. बुलडाणा): स्थानिक रेल्वे स्टेशन परिसरात वडाच्या झाडाखाली एक्का बादशाह नावाचा जुगार खेळणार्या पाच जणांना पोलिसांनी अटक करून त्यांच्या जवळून ४ हजार ४८0 रुपये व साहित्य जप्त केले. ही घटना ३0 जुलै रोजी घडली. नांदुरा रेल्वे स्टेशन परिसरात काही युवक एक्का बादशाहचा जुगार पैशाच्या हार-जीतवर खेळत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे छापा मारला असता सुधाकर हरिभाऊ निकम (वय ३0), दीपक बबन पानगे (वय ३३), आकाश मिलिंद भिडे (वय २२), राहुल गौतम काळे (वय २४), अमरदीप डिगांबर खंडागळे (वय ३२) सर्व राहणार नांदुरा हे जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून ४७६0 रुपये व साहित्य असा एकूण ४७८0 रुपयांचा ऐवज जप्त करून अप.क्र.३0६0/१५ कलम १२ अ जुगार अँक्ट नुसार कारवाई करून अटक केली.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}