शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात स्वाइन फ्लूचा पहिला बळी

By admin | Updated: April 22, 2017 00:58 IST

सामान्य रुग्णालयाच्या पथकाकडून सर्वेक्षण करण्यात आले.

खामगाव (जि. बुलडाणा): शहरातील हिरानगर भागातील २५ वर्षीय विवाहितेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. स्वाइन फ्लूचा हा शहरातील पहिला बळी गेला असून याबाबत सामान्य रुग्णालयाच्या पथकाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे.गत काही दिवसांपासून स्वाइन फ्लूची लागण झालेले रुग्ण अकोला येथील सवरेपचार रुग्णालय तथा खासगी रुग्णालयात दाखल झालेले असून, त्यातील पाच रुग्णांचा मृत्यूही झाला. यात हिरानगर भागातील २५ वर्षीय विवाहितेचा समावेश आहे. सदर महिलेचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाल्याची माहिती खामगाव येथील सामान्य रुग्णालयास ३ दिवसांपूर्वी मिळाली. त्यावरुन सामान्य रुग्णालयाच्या पथकाने हिरानगर भागात जावून सर्वेक्षण केले मात्र स्वाइन फ्लूसदृश आजाराची लक्षणे आढळून आली नाहीत. त्यामुळे कोणीही घाबरुन जाण्याची गरज नाही असे सामान्य रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.सामान्य रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डस्वाइन फ्लूबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्थानिक सामान्य रुग्णालयात शनिवार २२ एप्रिलपासून आयसोलेशन वॉर्ड सुरु करण्यात येत आहे. सदर वॉर्डची तयारी पूर्ण झाली असून यामध्ये व्हेंटीलेटर, नेब्युलायझर, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग व तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध राहणार आहेत. तसेच टॅमी फ्लू गोळ्यांसह पुरेसा औषधसाठा उपलब्ध असून आणखी औषधसाठी मागविण्यात आलेला आहे अशी माहिती सुत्रांनी दिली.स्वाइन फ्लूबाबत डॉक्टरांची कार्यशाळा लवकरचस्वाईन फ्लूबाबत डॉक्टरांना प्रशिक्षित करण्यासाठी शहरातील सर्व डॉक्टरांची कार्यशाळा आरोग्य विभागाच्यावतीने लवकरच घेण्यात येणार आहे. यामध्ये सर्व पॅथीच्या डॉक्टरांना निमंत्रित करुन स्वाईन फ्लूबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.स्वाइन फ्लू या रोगावर उपचार उपलब्ध असून रोग्यांनी कोणतीही लक्षणे जाणवल्यास हलगर्जीपणा न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेवर उपचार मिळाले तर हा रोग निश्‍चितपणे बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जावू नये. -डॉ. निलेश टापरेनिवासी वैद्यकीय अधिकारी