शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
4
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
5
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
6
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
7
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
8
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
9
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
10
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
11
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
12
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
13
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
14
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
15
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
16
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
17
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
18
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
19
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
20
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
Daily Top 2Weekly Top 5

आग लागून चार दुकाने भस्मसात

By admin | Updated: January 9, 2015 01:33 IST

चिखली येथील घटना; मूर्ती कारखान्यासह तीन दुकानांचे लाखोंचे नुकसान.

चिखली (बुलडाणा) : येथील जुनागाव चिंच परिसरातील चार दुकानांना ७ जानेवारीच्या मध्यरात्रीनंतर अचानक आग लागल्याने मूर्ती कारखान्यासह दोन हेअर सलून व एका गादी घरातील लाखो रुपयांचे साहित्य खाक झाल्याची घटना घडली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.शहरातील चिंच परिसरातील बैलजोडी परिसरात असलेल्या मुख्य मार्गावरील शे.कासिम शे.इस्माईल यांचे आनंद गादी घर, उत्तमराव चवरे यांचे रमेश हेअर ड्रेसर, भागवत शेळके यांचे तिरूपती हेअर आर्ट व कैलास पेंढारकर यांचे ङ्म्रीगुरूकृपा फायबर आर्टस या मूर्ती कारखान्याला ७ जानेवारीच्या मध्यरात्री अचानक आग लागली. यामध्ये आनंद गादी घरातील कापूस शेजारील फायबर आर्टस् (मूर्ती कारखाना) मधील फायबर व हेअर सलूनमधील लाकडी व प्लास्टिक साहित्यामुळे आगीने रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान, ही बाब परिसरातील नागरिकांना कळताच त्यांनी मिळेल त्या साधनांनी पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न चालविला व तातडीने नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. अग्निशामक दलाच्या उपस्थितीनंतर आगीवर पूर्णत: नियंत्रण मिळविण्यात यश आल्याने या दुकानांना लागून असलेल्या इतर दुकानांना आगीची बाधा पोहोचली नाही व पुढील अनर्थ टळला. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्य़ा चार दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले. कैलास पेंढाकार यांच्या मूर्ती कारखान्याचे सुमारे ८ लाख, आनंद गादीघराचे ४ लाख, तिरूपती हेअर आर्टचे अडीच लाख तर रमेश हेअर ड्रेसरचे दीड लाख रूपये असे सुमारे १६ लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीमुळे चारही व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, आमदार राहुल बोंद्रे, तहसीलदार राजेश्‍वर हांडे, मु ख्याधिकारी करणकुमार चव्हाण, ठाणेदार विजयसिंग राजपूत व विविध पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी करून आगपीडितांचे सांत्वन केले.